JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai Pune Highway Accident : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखत वडिलांचा मृत्यू

Mumbai Pune Highway Accident : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखत वडिलांचा मृत्यू

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 डिसेंबर : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यात कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, कार एका कठड्याला जाऊन धडकली. या कारमध्ये एकूण चालकासह चौघेजण होते. यामध्ये दोन मुलांसह पत्नी यांना किरकोळ दुखापत झाली आहे. परंतु चालक पती जागीच ठार झाला.

दरम्यान अपघात झाल्यानंतर मदतीला धावलेल्या लोकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. यामध्ये चालकाचा मृत्यू झाल्याने मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेला आहे. तर गाडीचा चक्काचूर झाला आहे. त्यामुळे अती वेगात असलेल्या कारचा अपघात अत्यंत भीषण असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा :  पगार मागितल्यानं मालकाला राग अनावर; कामगारासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसांकडून आरोपीचा शोध

संबंधित बातम्या

चालकाचे नियंत्रण सुटले अन् रस्त्यावर सोयाबीनचा सडा

हिंगणघाटकडे सोयाबीनचे पोते घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटल्याने ट्रक अनियंत्रीत होवून रस्त्याकडेला उलटला. हा अपघात मुंबई- नागपूर महामार्गावरील धोत्रा शिवारात रात्री घडला. अपघातात क्लीनर जखमी झाला असून सुदैवाने ट्रकचालकाला कोणतीही इजा झाली नाही. कलीम जमाल शेख असे जखमी क्लीनरचे नाव आहे. तर जब्बर हुसेन शेख असे ट्रकचालकाचे नाव आहे.

चालक जब्बर शेख हा ट्रकने अमरावती येथून सोयाबीनचे पोते भरुन हिंगणघाटकडे जात होता. धोत्रा शिवारात चालक जब्बारचा स्टेअरिंगवरुन ताबा सुटल्याने ट्रक अनियंत्रीत होऊन रस्त्याकडेला उलटला. सुदैवाने चालकाला दुखापत झाली नाही. मात्र, क्लीनर कलीम याच्या पायाला मार लागल्याने तो जखमी झाला. त्याला तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

जाहिरात

हेही वाचा :   नराधम पित्याचा आपल्याच मुलीवर बलात्कार; पीडितेने ऐनवेळी जबाब बदलला, तरीही ‘या’ एका कारणामुळे झाली 20 वर्षांची शिक्षा

अपघातात ट्रकसह सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यावर सोयाबीनचा सडा पडला होता. याची माहिती सावंगी पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करुन नोंद घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या