मुंबई,28 फेब्रुवारी: राज्यात येत्या 1 मेपासून सिंगल युज डिस्पोजेबल म्हणजेच एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. राज्यात प्लास्टिक बंदी असूनही काही भागात प्लास्टिक पिशव्यांची देवाणघेवाण सर्रास सुरू आहे. या संदर्भात काँग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून महिला बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्या उत्पादित केल्या जात आहेत. या बंदीतून प्लास्टिक बाटल्या वगळण्यात आल्या आहेत, अशीही माहिती आदित्य ठाकरे यांनी सभागृहात केली. प्लास्टिक बंदी एक लोक चळवळ व्हायला हवी. लोकांच्या सहभागाशिवाय प्लास्टिक बंदी यशस्वी होणार नाही. यासाठी लोकांनी प्लास्टिक वापरण्याची सवय आणि सोय बदलली पाहिजे, असेही मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर लगेचच बंदी आणता येणार नाही, हा मुद्दा धार्मिक भावनेशी निगडीत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. अकोल्यात शिवसेना नगरसेवकाचा राडा, सभेत खुर्च्यांची तोडफोड पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले आवाहन… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, केंद्र सरकारने 2 ऑक्टोबरपासून देशभरात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. या संदर्भात सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही केंद्र सरकरने जारी केल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीपूर्वी प्लास्टिक बॅग, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकॉलपासून तयार होणारी कटलरी बंद करण्याचा सरकारचा मानस असून यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत एकदा वापरण्यात येणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
उस्मानाबादमध्ये शिवसेनेला धक्का, बंडखोर नेत्याने अखेर हाती घेतला भाजपचा झेंडा त्यानंतर पर्यावरण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले बॅनर्स, प्लास्टिकचे झेंडे, फुलांचे पॉट्स, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदी वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.