जालना 31 जुलै : देशात एकीकडे वेगाने विकास होत असताना दुसरीकडे छोट्या छोट्या गावांमध्ये मात्र आजही नागरिकांना सुविधांअभावी अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या जालन्यातून समोर आली आहे. यात एका महिलेची भरपावसात रस्त्यावरच प्रसूती झाली. Beed : काळजीची बातमी! शहरात रक्ताचा तुटवडा, पेशंट्सचे वाढले हाल VIDEO असं म्हटलं जातं, की प्रसूती म्हणजे महिलेचा दुसरा जन्म असतो. ही वेळ गरोदर महिलेसाठी अत्यंत कठीण आणि तेवढीच घातकही ठरू शकते. त्यामुळे प्रसूती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी होणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, जालन्यामध्ये अतिशय अजब प्रकार घडला. इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारीच नसल्याने नामुष्की ओढावली आणि महिलेनं भरपावसात रस्त्यावरच बाळाला जन्म दिला.
ही घटना जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील आहे. रुपाली हारे असं या रस्त्यावर प्रसूती झालेल्या मातेचं नाव आहे. या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. ही घटना समाजाचं अतिशय भयंकर वास्तव दाखवणारी आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतानाच अजूनही अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांची वाणवा असल्याचं विदारक चित्र समोर येत आहे. अहमदनगर : सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून सुटली गोळी; बँकेच्या आवारात रक्ताचा सडा, ग्राहकाचा जागीच मृत्यू अशीच काहीशी आणखी एक घटना नुकतीच अहमदनगरमधूनही समोर आली होती. यात अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने भर पावसात ताडपत्री हातात धरून अंत्यविधी करावा लागला. वरून पाऊस तर खाली चिखलात चितेची अग्नी आणि त्यामध्ये फाटकी ताडपत्री धरून अंत्यविधी उरकणाऱ्या या नागरिकांचा व्हिडिओमध्ये समोर आला होता. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षात आजही अनेक वाडी-वस्त्या आहेत जिथे विकासाच्या वृक्षाचं बीज रोवलेलं दिसत नाही.