JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीडमधून आनंदवार्ता! 29 रुग्णांची कोरोनवर मात, तीन तालुके झाले कोरोनामुक्त

बीडमधून आनंदवार्ता! 29 रुग्णांची कोरोनवर मात, तीन तालुके झाले कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना बीड जिल्ह्यातून एक आंनदवार्ता आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 31 मे: राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना बीड जिल्ह्यातून एक आंनदवार्ता आली आहे. जिल्ह्यात 29 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच माजलगाव, गेवराई आणि केज हे तीन तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. हेही वाचा… 15 जूनपासून शाळा ? एका बाकावर एक विद्यार्थी; शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 63 जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर एकाचा मृत्यू झाला होता. सध्या 27 रुग्णांवर उपचार सुरू असून 6 जणांना पुढील उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आलं आहे. पुष्पवृष्टी करत दिला डिस्चार्ज… जिल्हा आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झालं. माजलगावमधील 13 रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. यावरी पुष्पवृष्टी करून सुरक्षित घरी पोहोचवण्यात आलं. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व त्यांच्या टीमचे कोरोनामुक्तांनी आभार मानले. आता तर नातेवाईकही स्विकारत नाही मृतदेह दुसरीकडे, औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात कोरोनानं हाहाकार उडवून दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1453 वर पोहोचला आहे तर आतापर्यंत 68 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या धास्तीनं मृतदेह नातेवाईक स्विकारायला तयार होत नाही आहेत. त्यामुळे कोरोनाची दहशत किती आहे, याची कल्पना येते. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह स्विकारण्यास चक्क नकार दिला. यावेळी पंचशीला महिला बचत गटाच्या महिलांनी संबंधित रुग्णाचा मृतदेहा ताब्यात घेतला. रुग्णाच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार केले. औरंगाबाद शहरात नागरिकांमध्ये कोरोनाची एवढ भीती आहे की, आपल्या नातेवाईकांचा मृतदेह सुद्धा नागरिक ताब्यात घेत नाही आहेत. अशा वेळी महापालिकेने ही जबाबदारी महिलांच्या बचत गटावर सोपवली आहे. जिगरबाज महिला संपूर्ण काळजी घेऊन कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करतात. हेही वाचा..  कोरोनाबाधित रुग्णांनं क्वारंटाईन सेंटरच्या बाथरुममध्ये लावला गळफास अंत्यसंस्कार करतेवेळी या महिला पूर्णपणे सुरक्षितता पाळतात. पंचशीला महिला बचत गटाच्या महिला या कार्याला माणुसकीचे कार्य समजतात. पूर्ण सुरक्षितेची काळजी घेतली तर घाबरण्याचे कारण नाही, असा संदेश पंचशीला बचत गटाच्या महिलांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या