अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून शंकर पट सुरू आहे. पट पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी लोक येतात. मात्र सोमवारी
अमरावती, 17 जानेवारी : भिर्रर्र म्हणत शेत शिवारात सध्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. मोठ्या संख्येनं गावकरी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी एकच गर्दी करत आहे. अमरावती जिल्ह्यात मात्र एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शंकरपट पाहून घरी परतणाऱ्या चार जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून शंकर पट सुरू आहे. पट पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी लोक येतात. मात्र सोमवारी शंकर पट पाहून घराकडे परताताना रात्री उशिरा तळेगाव परिसरात दोन अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. शंकरपट पाहून घराकडे परतणाऱ्या दुचाकीवरील युवकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. (ओढणीवरील बोरकोडने उकललं त्या महिलेच्या पुण्यातील हत्येचं गूढ; 2 प्रियकरांनीच काढला काटा) तर दुसऱ्या घटनेत यवतमाळहून धामणगावकडे येत असलेल्या दुचाकीवरील दोघांना कारने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे आणि कारचालक असे तिघे जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीचा चुराडा झाला तर कारचेही मोठे नुकसान झाले. या घटना अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी व सहायक पोलीस निरीक्षक मिश्रा करीत आहे. मर्सिडीजची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार दरम्यान, नाशिककडे भरधाव जाणाऱ्या मर्सिडीज कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. पिंपळकोठा गावाजवळील महामार्गावर हा अपघात झाला. (2 बहिणींना गावभर शोधले अन् घराजवळच्या विहिरीत पाहिले तर कुटुंबाला बसला धक्का) अपघातानंतर मर्सिडीज चालक आणि अन्य दोघांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी कारचालक व दोघा प्रवाशांची जमावाच्या तावडीतून सुटका केली. पिंपळकोठा येथील नितीन जामसिंग पाटील, घनश्याम भानुदास बडगुजर हे दोघे दुचाकीने घरी जात होते. तर नारायण धनसिंग पाटील हा युवक रस्त्याच्या कडेने पायी शेतात जात होता. पिंपळकोठा जवळील नाल्याजवळ मर्सिडीजने दुचाकीला समोरून धडक दिली. त्यामुळे तर नितीन पाटील व घनश्याम बडगुजर हे दोघे ठार झाले. तर नारायण पाटील गंभीर जखमी झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.