राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर 20 सप्टेंबर : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगाव येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो आणि क्रेटा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणारी भरधाव क्रेटा कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती कार टेम्पोवर धडकल्याने भीषण अपघात घडला.
बीड : धरणात बुडालेल्या डॉक्टरची सुरू होती शोधाशोध, बचावकार्यादरम्यान NDRFच्या जवानाचाच दुर्दैवी अंत
भरधाव क्रेटा कार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोवर धडकली . हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनास्थळावरील काही फोटो समोर आले असून या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळतं.
या घटनेत चारचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून तिघांचा मृत्यू झाला आहे
नागपूर : फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. या मार्गावरील 82 ब्लॅकस्पॉटकडे (अपघातप्रवण क्षेत्रे) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंत्राटदारांचे दुर्लक्ष झाल्याने हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातही याच महामार्गावर झाला होता.