जालना 30 जुलै : जालन्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जालन्यातील पाच मित्र शहरापासून जवळच असलेल्या बेथलम येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पोहत असताना दोघा जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते तलावात बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शाळेत जाणाऱ्या मुलीला टिपरने चिरडले, भावासमोर बहिणीचा मृत्यू शहरातील बैदपुरा,कबाडी मोहल्ला आणि खडकपुरा येथील पाच तरुण हे बेथलम परिसरात फिरण्यासाठी गेले होते. शुक्रवारी सायंकाळी फिरत फिरत ते एक तलावाजवळ पोहोचले. यानंतर त्या ठिकाणी हे पाच ही जण पोहण्यासाठी तळ्यात उतरले. मात्र, काहीवेळानंतर या पाच जणांपैकी केवळ तिघेच बाहेर आले. आधी संमतीने ठेवले संबंध; मग पैशाची मागणी, जीवे मारण्याची धमकी अन्.., पुण्यातील व्यावसायिकासोबत विचित्र प्रकार खडकपुरा येथील जुनेद फिरौज बागवान आणि बैदपुरा येथील नदीम खान बाबु खान हे दोघे जण बराच वेळ झाला तरी बाहेर आले नाहीत. त्यामुळे इतर तिघांना संशय आला. यानंतर घाबरलेल्या तरुणांनी आरडाओरड केली. यानंतर घटनास्थळी ग्रामस्थ जमा झाले. ग्रामस्थांनी पोलीस आणि अग्निशामक दलास कळवून शोधकार्य सुरु केलं. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. दरम्यान नुकतंच समोर आलेल्या दुसऱ्या एका घटनेत इंदापूर तालुक्यामध्ये माल वाहतूक करणाऱ्या हायवा टिपरने एका 13 वर्षीय शाळकरी मुलीला चिरडल्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी टिपर पेटवला. तृप्ती नाना कदम (वय 13 वर्ष) असं मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. तृप्ती आणि तिचा भाऊ गणेश नाना कदम हे दोघे शाळेत जात होते. त्याचवेळी भरधाव वेगात जाणाऱ्या हायवा टिपरने दोघांना धडक दिली.