JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लहान मुलांच्या ICU वॉर्डमध्ये लागली आग; अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटना

लहान मुलांच्या ICU वॉर्डमध्ये लागली आग; अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटना

ही आग लहान मुलांच्या आयसीयू वार्डात लागल्याने इथे असलेल्या लहान मुलांना तातडीने दुसऱ्या वार्डात शिफ्ट करण्यात आलं. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती 25 सप्टेंबर : अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलांच्या आयसीयू कक्षाला ही आग लागली. यानंतर तात्काळ अग्निशामक दल रुग्णालयात दाखल झालं. वेळीच खबरदारी घेतल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या भक्तावर काळाचा घाला, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, गाव हळहळलं ही आग लहान मुलांच्या आयसीयू वार्डात लागल्याने इथे असलेल्या लहान मुलांना तातडीने दुसऱ्या वार्डात शिफ्ट करण्यात आलं. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, या आगीमध्ये दोन बालकं किरकोळ जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने पंजाबराव देशमुख रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतरअमरावती दौऱ्यावर आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी याठिकाणी पाहणी करून घटनेची माहिती घेतली आहे रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नाना पटोले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचेही आभार मानले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, की  सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री आहे. प्रशासन आणि शासन या दोन्ही गोष्टीचा समन्वयक नाही. शासनाची भूमिका स्पष्ट होत नाही. लोकशाहीची थट्टा शिंदे आणि भाजप सरकारकडून होत आहे. पालकमंत्री स्पायडरमॅनसारखे काम करणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या