JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'अर्ज' किया है, कुठे शक्तीप्रदर्शन तर कुठे गुपचूप !

'अर्ज' किया है, कुठे शक्तीप्रदर्शन तर कुठे गुपचूप !

25 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी आज (मंगळवारी) आपले अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना अनेक पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. तर पुण्यात विश्वजीत कदम यांनी कोणताही गाजावाज न करता अर्ज भरला. नांदेडमध्ये लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या दुपारपर्यंतची वेळ आहे, मात्र नांदेडचा काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही. पण त्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरलेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

25 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी आज (मंगळवारी) आपले अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना अनेक पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. तर पुण्यात विश्वजीत कदम यांनी कोणताही गाजावाज न करता अर्ज भरला. नांदेडमध्ये लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या दुपारपर्यंतची वेळ आहे, मात्र नांदेडचा काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही. पण त्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरलेत. हे दोघेही काँग्रेस पक्षातले आहेत, मात्र उमेदवारी कोणाला मिळणार, याचा तिढा अजूनही कायम आहे. या दोघांपैकी कुणाला काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म मिळेल, याची उत्सुकता आहे. किंवा ऐनवेळी अशोक चव्हाण उमेदवारी दाखल करू शकतात. विश्वजीत कदमांचा गुपचूप अर्ज तर पुण्यात काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी काहीच गाजावाज न करता गुपचूप अर्ज भरला. यावेळी पतंगराव कदम, वंदना चव्हाण, मोहन जोशी, अभय छाजेड होते उपस्थित. आजचा मुहूर्त चांगला असल्यानं त्यांनी फॉर्म भरल्याची चर्चा आहे. उद्या ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतही पुन्हा अर्ज भरणार आहे. पायगुडे रिक्षाने आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह बाईक आणि कार रॅली काढत अर्ज दाखल केला. पायगुडे यांनी रिक्षाने येऊन आपला अर्ज दाखल केला. पायगुडे यांच्या रॅलीमध्ये शर्मिला ठाकरे उपस्थिती होत्या. राज ठाकरे पुण्यात प्रचारासाठी 3 सभा घेणार आहेत. गुढीपाडव्याला ते प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. अनिल शिरोळेंचा अर्ज दाखल तसंच पुण्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार अनिल शिरोळे यांनीही आज अर्ज भरला. त्याआधी त्यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिवसेना, रिपाइं आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांसह उघड्या जीपमधून रॅली काढली. या सर्व लवाजम्यासह शिरोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या