न्यूयॉर्क, 9 ऑगस्ट : जीवापाड ज्या प्रियकरावर (boyfriend) प्रेम केलं, त्याचं बिंग गुगल सर्चमुळे (Google Search) फुटल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. एकमेकांवर अतिशय उत्कट प्रेम करणाऱ्या जोडप्याच्या नात्यामध्य़े कधी आणि कुठल्या कारणाने दुरावा येईल, हे सांगत येत नाही. अनेकदा अशी एखादी घटना घडते, ज्यामुळे वर्षानुवर्षं एकमेकांवर असणारा विश्वास क्षणार्धात तुटून पडतो. अमेरिकेतील टिकटॉक युजर प्रिससोबत अशीच घटना घडली. प्रिसनं सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षांपासून ती बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघं अनेकदा बाहेर फिरायला जात असत. एकदा असेच दोघे बाहेर एके ठिकाणी फिरायला गेले असता तिच्या बॉयफ्रेंडचा मोबाईल हरवला. आपला मोबाईल हरवल्याचं त्यानं सांगितल्यावर तिला आश्चर्य वाटलं, मात्र त्याकडे तिनं फारसं लक्ष दिलं नाही. प्रवासातून परत आल्यानंतर तिनं त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल नंबर लागत नव्हता. काही दिवसांत आपला बॉयफ्रेंड नवा मोबाईल घेईल आणि आपल्याला फोन करेल, अशी तिची अपेक्षा होती. मात्र अऩेक दिवस झाले तरी त्याचा फोन न आल्यामुळे तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर तिने थेट त्याचं घर गाठलं. मात्र त्याच्या घराला कुलूप होतं. आता मात्र त्याचा काहीही थांगपत्ता लागण्याची शक्यता तिला वाटेना. शोध सुरूच तिने सर्व प्रकारे आपल्या बॉयफ्रेंडचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याकडे त्याचा जुना मोबाईल नंबर आणि त्याच्या घरचा पत्ता या दोन गोष्टी सोडल्या, तर त्याच्याशी संपर्क करण्याचा इतर कुठलाच मार्ग नव्हता. तिच्या बॉयफ्रेंडचा ईमेलही तिच्याकडे नव्हता. शिवाय तो कुठल्याही सोशल मीडियावर सक्रीय नसल्यामुळे तो मार्गही उपलब्ध नव्हता. हे वाचा - नाशिकनंतर ठाण्यात Delta Variant चा शिरकाव; 4 रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क गुगल सर्चने दिला धक्का एक दिवस तिने सहज गुगलवर तिच्या बॉयफ्रेंडचे नाव टाकले. समोर आलेली माहिती तिच्यासाठी गोंधळात टाकणारी होती. एका लहान मुलाच्या प्रोफाईलसंदर्भात तिच्यचा बॉयफ्रेंडचे नाव तिला दिसत होते. कदाचित, नामसाधर्म्य असावे, असे तिला वाटले. मात्र तरीही उत्सुकतेपोटी तिने त्या मुलाचे प्रोफाईल उघडले, तर तिच्या बॉयफ्रेंडचे पूर्ण नाव जसेच्या तसे त्या प्रोफाईलवर दिसत होते. त्यानंतर तिने एका मित्राच्या मदतीने त्या मुलाच्या आईचे प्रोफाईल शोधले. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जेव्हा ती पोहोचली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकल्याची बातमी ‘ आज तक ’ने दिली आहे. तिचा बॉयफ्रेंड या सहा महिन्यांच्या बाळाचा बाप असल्याचा साक्षात्कार तिला झाला. या अकाऊंटवर पत्नी आणि छोट्या बाळासह तिच्या बॉयफ्रेंडचे फोटो पाहून तिला जबर धक्का बसला. आपला हा अनुभव तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.