दिल्ली, 14 सप्टेंबर : अनेकांना ऐन तारूण्यात किंवा पन्नाशीच्या वयात केसगळतीची समस्या निर्माण होते. त्यामुळे या केसगळतीचा (hair fall) त्यांना फार त्रास होत असतो. त्यासाठी ते आपल्या आहाराला (Diet) किंवा वाढत्या वयाला जबाबदार धरत असतात. परंतु एकदा गेलेले केस पुन्हा येण्याची शक्यता फार कमी असते. अशावेळी केसगळतीने (Yoga for hair baldness treatment) त्रस्त असलेले लोक डॉक्टरांचा सल्ला घेतात. त्यामुळेही फार काही फरक पडत नाही, अशा वेळी त्यांना पुन्हा त्याच समस्येला सामोरं जावं लागतं. परंतु जर तुम्हाला तुमची केसगळती थांबवायची असेल तर आता केवळ एका योगासनाने ते शक्य आहे. त्यासाठी काय करावे, तो योग कसा करावा, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. बालायम (yoga for hair fall balayam) नावाचा एक योगप्रकार आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या डोक्यावरील केसगळतीला ब्रेक देऊ शकता. दररोज सकाळी फक्त 5-10 मिनिटं हा योग केला तर याचा फायदा होऊ शकतो. ज्यामुळे फक्त केसगळतीच थांबत नाही तर डॅंड्रफ, ड्राय स्कॅल्प, केसांचा पातळपणा आणि हेयर फॉल असा समस्यांवर मात करता येते. तुम्हीही ‘या’ पद्धतीनं जेवण करत असाल तर व्हाल कर्जबाजारी; 5 गोष्टींची घ्या काळजी बालायम योग कसा करावा? बालायम हा योगप्रकार (yoga benefits) तुम्ही उभं राहून अथवा तुम्ही कुठे प्रवासात असाल तरीदेखील करू शकता. यासाठी सर्वात आधी आपल्या दोन्ही हातांना छातीजवळ घ्या. त्यानंतर हातांच्या दोन्ही हाताच्या नखांना एकमेकांवर रगडा. यात अंगठ्याच्या नखाला रगडायचे नाहीये, याची काळजी घ्या. कारण त्याने चेहऱ्यावरील केस वाढतात. या पद्धतीचा योग हा दररोज 5-10 मिनिटं केल्याने याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील. दररोज बालायम हा योगप्रकार केल्यानंतर तुम्हाला याचा फरक लगेत दिसणार नाही. त्यासाठी 3 ते 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तेवढ्या काळात तुमचे गळणारे केस कमी होतील. त्याचबरोबर शीर्षासन, अधोमुख श्वानासनाबरोबर जर तुम्ही हा बालायम योग करत असाल तर याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील.