JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Gold burger नंतर आता Gold biryani; रॉयल बिर्याणीची किंमत वाचूनच शॉक व्हाल

Gold burger नंतर आता Gold biryani; रॉयल बिर्याणीची किंमत वाचूनच शॉक व्हाल

जगातील ही सर्वात महाग बिर्याणी (biryani) असल्याचं सांगितलं जातं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 01 फेब्रुवारी : बिर्याणी (biryani) म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मग ही बिर्याणी सोन्याची (gold biryani) आहे, असं सांगितलं तर. व्हेज बिर्याणी ऐकली आहे, नॉनव्हेज बिर्याणी ऐकली आहे पण गोल्ड किंवा सोन्याची बिर्याणी हा काय प्रकार आहे, असंच तुम्ही म्हणाल आणि ही बिर्याणी नेमकी मिळते कुठे असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही गोल्ड बिर्याणी आहे दुबईत. जगातील सर्वात महाग बिर्याणी असल्याचं सांगितलं जातं आहे. DIFC मधील Bombay Borough रेस्टॉरंटमध्ये ही रॉयल बिर्याणी खायला मिळेल. रिपोर्ट नुसार रेस्टॉरंटला एक वर्ष झाल्यानंतर हा मेन्यू अॅड केला होता.  ही बिर्याणी 23 कॅरेट सोन्यानं ती सजवली जाते. रिपोर्टनुसार रेस्टॉरंटला एक वर्ष झाल्यानंतर हा मेन्यू अॅड केला होता.

संबंधित बातम्या

याशिवाय यामध्ये कश्मीरी मटण, कबाब, पुरानी दिल्ली मटण चॉप्स, राजपूत चिकन कबाब, मुगलई कोफ्ते, मलाई चिकनही आहे.  गार्निशिंगमध्ये केसर, सोनं आणि सोबत सॉस, करी आणि रायता. वाचून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना? आता याची नेमकी किंमत किती आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर ही बिर्याणी एक प्लेट 20 हजार रुपयांना आहे. इतकं सगळं वाचून तुम्हालाही ही बिर्याणी खायची इच्छा झाली असेल पण त्याची किंमत तुम्हाला परवडणारी नाही. तर काळजी करू नका. बिर्याणीची एक प्लेट तुम्ही सहा जणांमध्ये खाऊ शकता. ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या 45 मिनिटांत ही बिर्याणी तुमच्यासमोर तुमच्या टेबलवर येईल. ज्याचा तुम्ही पुरेपूर आस्वाद लुटू शकता. याआधी एका कोलंबियन रेस्टॉरंटनं (Columbia) 24 कॅरेट सोन्याचं (gold) गोल्ड बर्गर (golden burger) बनवलं होतं.  डबल मीट आणि डबल चीजसह 24 कॅरेट सोनं वापरून ऑरो मॅककॉय हा बर्गर तयार करण्यात आला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या बर्गरसची किंमत तब्बल 4191 रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या