डोळ्यांची दृष्टी
मुंबई, 13 ऑक्टोबर : आपल्या बदलत्या जीवनशालीप्त आपल्याला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. हल्ली लोकांचा स्क्रीन टायमिंग इतका वाढला आहे की, त्यांच्या डोळ्यांवर त्याचा परिणाम खूप लवकर दिसायला लागतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं सध्या कळत प्राथमिक काम आहे. लोकांमध्ये डोळयांच्या आरोग्याविषयी आणि संभाव्य समस्यांविषयी जागरूकता वाढावी, यासाठी वर्ल्ड साईट डे म्हणजेच जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. यानिमित्त आज आम्ही तुम्हाला डोळ्यांच्या काही व्यायामांविषयी माहिती देणार आहोत. जे केल्यास तुम्ही तुमच्या डोळ्यांचे आरोग्य राखू शकता. लायन क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशनने ‘जागतिक दृष्टी दिन’ सुरू केला. अंधत्व प्रतिबंध याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. या दिवशी ज्यांना दृष्टीसंबंधी समस्या येत आहेत, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला जातो. हा दिवस ऑक्टोबरच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो आणि यावर्षी हा दिवस 13 ऑक्टोबर रोजी साजरा होईल.
तुमच्याही डोळ्यांना खाज आणि जळजळ होतेय? ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीरउत्तम दृष्टीसाठी करा हे व्यायाम - DNA ने दिलेल्या माहितीनुसार, डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काही सोपे व्यायाम करू शकता. सर्वात पहिला व्यायाम करण्यासाठी खुर्चीवर ताठ बसा आणि तुमचे शरीर स्थिर ठेवा. पेन घ्या, एक डोळा बंद करा आणि पेन तुमच्या डोळ्याच्या पातळीवर आणा आणि टोकावर लक्ष केंद्रित करा. पेन दृष्टीपासून जवळ आणि दूर हलवा. आता दुसऱ्या डोळ्यासोबतही असेच करा. प्रत्येक डोळ्यासोबत याची 5 वेळा पुनरावृत्ती करा.
- सूर्याची किरणं पडत असतील अशा ठिकाणी पायांमध्ये अंतर घेऊन उभे राहा. डोळे बंद करा आणि सूर्याकडे तोंड करा. तुमचे डोळे घट्ट बंद करू नका, हलकेच बंद ठेवा. सूर्याची किरण डोळ्यावर पडतील याची खात्री करून तुमचे डोके हळू हळू डावीकडून उजवीकडे हलवा. दररोज सकाळी लवकर 2 मिनिटे हा सराव करा. हा व्यायाम तुमच्या रेटिनाला चांगल्या प्रकारे उत्तेजित करतो. - या व्यायामासाठी दोन जणांनी एकमेकांसामोर उभे राहा. एक मध्यम आकाराचा बॉल घ्या, तो समोरच्या व्यक्तीकडे फेकून द्या आणि ती व्यक्ती पकडताच तुम्ही बॉलकडे पाहून डोळे मिचकवा. जेव्हा ती व्यक्ती बॉल तुमच्याकडे परत फेकते तेव्हा पुन्हा डोळे मिचकावा. हा व्यायाम डोळ्यातील स्नायूंवर काम करतो आणि डोळ्यातील लेन्सची लवचिकता वाढवतो. ..तरच पालकचे मिळतील अस्सल फायदे, घरच्या घरी या सोप्या पद्धतीने पिकवून पाहा - आपल्या मांडीवर उशी घेऊन आरामदायी जागी बसा. उष्णता निर्माण करण्यासाठी आपले हात एक मिनिट एकत्र घासून घ्या आणि नंतर आपला तळहात आपल्या डोळ्यांवर ठेवा. डोळ्यावर हात कपप्रमाणे ठेवा तुम्ही ते दाबत नसल्याची खात्री करा. तुमचे डोळे उघडे ठेवा आणि 20 पर्यंत मोजा. तुमच्या डोळ्यांना तुमच्या हातातील अंधार दिसू द्या. हा सर्वोत्तम व्यायाम आहे, कारण तो संपूर्ण डोळ्यांना आराम आणि दृष्टी पुनर्संचयित करण्यासाठी कार्य करतो.