नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : रोजच्या जगण्यात आपण अनेक शब्द असे वापरतो, ज्यांचा अर्थदेखील आपल्याला माहीत नसतो. काही वेळा त्याची गरजही आपल्याला वाटत नाही. विशेषतः नातेसंबंधांविषयीचे शब्द पूर्वापार चालत आलेले आहेत. नुकताच Husband या शब्दावरून सोशल मीडियावर (Objection For The Word Husband) एक वाद उत्पन्न झाला होता. या शब्दाचा खरा अर्थ काय, हा शब्द कोणत्या भाषेतून आला, याबाबत या निमित्ताने जाणून घेऊ. अमेरिकेत राहणाऱ्या Audra Fitzgerald या सोशल मीडिया युझरनं टिकटॉकवर (Tik Tok) एक व्हिडिओ शेअर केला होता. बऱ्याच काळापासून असलेल्या बॉयफ्रेंडसोबत तिनं लग्न केलं आणि आता आपल्या नवऱ्याला मी Husband म्हणणार नाही, असा व्हिडिओ तिनं टिकटॉकवर अपलोड होता. न्यूयॉर्कमध्ये राहणारी 26 वर्षीय ऑड्रा स्त्रीवादी (Feminist) आहे. आता नवऱ्याला Husband म्हणण्याऐवजी Wer म्हणणार असल्याचं तिनं यात म्हटलंय. Wer चा अर्थही नवरा असाच होतो, जो पत्नीसोबत (Wife) राहतो. तिच्या या व्हिडिओमुळे अनेक चर्चांना उधाण आलं. अनेक महिलांनी हा व्हिडिओ पाहिला. त्यावरून वादही सुरू झाले. या पोस्टनंतर अनेक स्त्रिया ऑड्राला पाठिंबा देत आहेत, असं न्यूयॉर्क पोस्टनं म्हटलंय, तर काहींनी हा उगाचच निर्माण केलेला वाद आहे, असंही म्हटलंय. BreaK-Up: ब्रेकअप झालाय? दुःखातून सावरण्यासाठी उपयोगी पडतील ‘या’ टिप्स अनेक वर्षांपासून नवऱ्याला Husband असं म्हटलं जात असताना यावरून आत्ताच वाद निर्माण होण्याचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. ऑड्राच्या मते हा शब्द लिंगवाचक आहे आणि यातून पितृसत्ताक वृत्ती दिसते, असं डेली मेलनं म्हटलंय. लॅटिन भाषेत ‘Hus’चा अर्थ (Meaning Of The Word) हाउस म्हणजे घर असा होतो. ‘Band’ हा शब्द बॉडीवरून घेतला गेला आहे. एखाद्या जमिनीवर किंवा संपत्तीवर अधिकार असलेली ही व्यक्ती असते. म्हणजेच घराची मालकी (Owner Of Asset) असलेला किंवा अधिकार गाजवणारा तो Husband असा अर्थ यातून निघतो. ही गोष्ट स्त्रियांना कमी लेखणारी वाटू शकते. काही जणांच्या म्हणण्यानुसार, hūsbōndi म्हणजे घराचा मालक यावरून Husband हा शब्द इंग्रजीत तयार झाला आहे. एखाद्या शब्दावरून काही वेळा वाद निर्माण होतात. अशा वेळी त्या शब्दाची उत्पत्ती, त्याचा मूळ अर्थ व सध्याच्या परिस्थितीत त्या शब्दाचा वापर या अनुषंगानं त्यावर विचार करणं गरजेचं असतं. अशा शब्दांविषयी अनेक जण गुगलवर सर्च करतात. Husband या शब्दावरच्या विवादामुळे त्याचा अर्थ व लॅटिन भाषेतली त्याची उत्पत्ती याविषयीही अनेकांना माहिती मिळाली.