जीममध्ये महिलेवर संकट.
वॉशिंग्टन, 03 सप्टेंबर : वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरयष्टी बनवण्यासाठी बरेच लोक जीममध्ये एक्सरसाइझ करायला जातात. पण काही वेळा ही एक्सरसाइझ महागात पडू शकते. अमेरिकेती एका महिलेसोबत असंच घडलं. ती जीममध्ये गेली आणि तिथं तिचा जीव लटकला. अखेर तिला सोडवण्यासाठी पोलिसांना कॉल केला. नेमकं असं या महिलेसोबत घडलं तरी काय? अमेरिकेच्या ओहियोत राहणारी क्रिस्टिन फाऊल्डस. बेरियातील पॉवरहाऊस जीममध्ये गेली. ती अपसाइड डाऊन एक्सरसाइझ करत होती. एक्सरसाइझ करताना ती स्वतःच स्वतःचा व्हिडीओ बनवत होती. त्याचवेळी तिच्यासोबत भयंकर घटना घडली. जीमच्या इक्विपमेंटमध्ये ती अडकली. क्रिस्टिनचा कॅमेरा सुरूच होता. ती जितका वेळ लटकली तितका वेळ कॅमेऱ्यात सर्वकाही कैद झालं. हे वाचा - Shocking! सामान उचलायला वाकली आणि झाला मृत्यू; महिलेची एक छोटीशी चूक जीवावर बेतली 24 तास खुलं असलेल्या या जीममध्ये रात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली. पण यावेळी खूप कमी लोक होते. हे लोकसुद्धा जीम नव्हे तर दुसऱ्या खोलीत होते. त्यामुळे क्रिस्टिनला वाचवण्यासाठी तिथं दुसरं कुणीच नव्हतं. अखेर तिच्या स्मार्टवॉचने तिचा जीव वाचवला. तिने स्मार्टवॉचच्या मदतीने पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी तिला जीमच्या मशीनमधून बाहेर काढलं. सुदैवाने तिला या घटनेत दुखापत झाली नाही. पण आता काही दिवस सोशल मीडियापासून आणि त्या टेबलपासून दूर राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे. आज तक च्या रिपोर्टनुसार हेल्थलाइनच्या मते, अपसाइड-डाऊन एक्सरसाइझमध्ये बराच वेळ उलटं लटकल्याने रक्त डोक्यात जमा होऊ शकतं, जे शरीरासाठी घातक ठरू शकतं.