JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बापरे! कसला विचित्र आजार; बोचकारून बोचकारून महिलेने स्वतःच स्वतःच्या त्वचेची लावली वाट

बापरे! कसला विचित्र आजार; बोचकारून बोचकारून महिलेने स्वतःच स्वतःच्या त्वचेची लावली वाट

महिलेला लहानपणापासूनच त्वचेला बोचकारण्याची सवय होती. तिची ही सवय म्हणजे एक विचित्र आजार होता.

जाहिरात

पहिल्या पावसातील खराब पाण्यामुळे आपल्याला स्कीनचे प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात. हवेतील प्रदूषित घटकांमुळे आपल्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. अनेकांना पहिल्या पावसात भिजल्यानंतर स्कीन प्रॉब्लेम सुरू झाल्याचे दिसून येते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मार्च : व्यक्तीचं स्वतःवर सर्वात जास्त प्रेम असतं. आपल्याला दुखापत व्हावी, हानी व्हावी असं कुणालाच वाटत नाही. साधं किचिंतसं कापलं, भाजलं तरी आपल्याला किती वेदना होतात. पण एक महिला मात्र अशा वेदना स्वतःला मुद्दामहून देते आहे. ती स्वतःच स्वतःची त्वचा बोचकारते (Woman Picking at her own skin). तिने आपल्या त्वचेची वाट लावली आहे आणि याचं कारण म्हणजे तिला असलेला विचित्र आजार (Weird Disease). आपल्याला काही ना काही सवय असते. कुणाला ओठ चावण्याची, कुणाला नाकाला सतत हात लावण्याची. या महिलेला मात्र स्वतःची त्वचा बोचकारण्याची सवय आहे. तिच्या या सवयीमुळे तिच्या त्वचेवर जखमा झाल्या आणि तिला इन्फेक्शनही झालं. अमेरिकेच्या शिकागोमध्ये राहणारी 35 वर्षांची लॉरेन मॅककीनी (Lauren McKeaney) स्वतःच्या शरीराला नुकसान पोहोचवते आहे. लहानपणापासूनच तिला ही सवय आहे. आपण असं का करतो हे तिलाही माहिती नव्हतं. अखेर ती मोठी झाली तेव्हा तिला आपल्या या आजाराबाबत समजलं. हे वाचा -  शरीरातील अतिरिक्त चरबीचा विचार करण्याच्या क्षमतेवरही होतो परिणाम - Study

तिला ऑब्सेसिव्ह कम्पल्शन डिसॉर्डर म्हणजे ओसीडी आहे. ज्यामुळे ती स्वतःला इतका त्रास करून घेते. तिला डर्मेटिलोमॅनिया ( dermatillomania) नावाचा ओसीडी आहे. यामध्ये व्यक्ती स्वतःच स्वतःच्या त्वचेला चिमटा काढते, त्वचेला जखमा करते किंवा चावतेसुद्धा. द सनच्या रिपोर्टनुसार अशा लोकांच्या शरीरावर जखमा होतात. लॉरेनला या आजारामुळे झालेल्या जखमांमध्ये इन्फेक्शनही झालं. जांघेतील जखमेमुळे तिला MRSA नावाच्या बगने हल्ला केला. त्यामुळे तिचा पायही कापावा लागला. त्यावेळी तिला या आजाराचं गांभीर्य समजलं. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती असं करत होती पण का हे तिला कळेना. हे वाचा -  Darken Beard: दाढी-मिशीचे केस पांढरे होताहेत? या 5 घरगुती उपायांनी बनवा काळेभोर लॉरेन म्हणाली, लहानपणापासून आलेल्या या आजारामुळे तिला बरंच काही गमाववं लागलं. शरीरावर ठिकठिकाणी डाग असल्याने लोक तिला चिडवायचे. अखेर या आजाराबाबत समजताच ती आपली बोटं इतर कामात व्यस्त ठेवते, जेणेकरून त्वचेला ती हानी पोहोचवणार नाही. तरी कित्येक वेळा तिलाही समजत नाही की तिची बोटं कधी तिच्या त्वचेवर जातात. हीच या आजाराची सर्वात मोठी समस्या आहे. आता ती स्वतःवर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करते आहे सोबतच अशा आजाराने ग्रस्त असलेल्या इतर लोकांनाही जागरूक करते आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या