स्टडी रूमसाठी वास्तु उपाय - 1. वास्तूनुसार अभ्यासाची खोली नैऋत्य कोनात (दक्षिण-पश्चिम मध्यभागी) आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी बनवणे चांगले मानले जाते.
मुंबई, 18 मार्च : घरातील प्रत्येक खोली योग्य दिशेला असणं फक्त पुरेसं नाही. वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीमुळं सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहते. त्यामुळं घरात ठेवलेल्या वस्तूंची नीट काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा घरातील सुख-शांती नष्ट होऊन एकामागून एक संकटांना सामोरं जावं लागतं. जाणून घेऊया कोणत्या वस्तूंना घरात कधीही स्थान (Vastu Tips) देऊ नये. या गोष्टी चुकूनही घरात ठेवू नका झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार घरात कधीही काटेरी झाडं ठेवू नका. काटेरी झाडं घरात नकारात्मकता आणतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. तसंच, बोन्साय वनस्पती प्रगतीमध्ये अडथळा आणते, असं काहींचं मत आहे. घरात या वनस्पतींच्या उपस्थितीमुळे अनेक वास्तुदोष निर्माण होतात. घराच्या भिंतींवर वन्य प्राण्यांची चित्रं, युद्धाची चित्रं, उजाड निसर्गचित्रं, कोरड्या झाडांची चित्रं लावण्याची चूक कधीही करू नका. असं केल्यानं अनेक समस्या, तणाव येत राहतात. घरामध्ये नेहमी आनंदी, रंगीबेरंगी आणि मन प्रसन्न करणारी चित्रं ठेवा. घरामध्ये कोळ्याचं जाळं असणं फारच अशुभ असतं. याच्यामुळं घरातल्या लोकांमध्ये आळस आणि चिडचिडेपणा येतो. ते गोंधळलेल्या मनस्थितीत राहतात. त्यांची प्रगती खुंटते. योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. एकूणच, घरात कोळ्याचं जाळं असणं हे परस्पर संबंध आणि नोकरी-व्यवसाय या दोन्हींसाठी चांगलं नाही. हे वाचा - अंघोळ करताना होणाऱ्या या चुका टाळा; तुमच्या Natural beautyवर होईल असा परिणाम भांडी, तुटलेली काच, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, फाटलेली चित्रं, फर्निचर इत्यादी तुटलेल्या, खराब वस्तू घरात कधीही ठेवू नका. ते घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. याच्यामुळं पैशाचं नुकसान होणं आणि गरिबी येणं अशा गोष्टी घडू शकतात. हे वाचा - या 5 डाळींमधून मिळतं मुबलक प्रोटीन; पिळदार बॉडी बनवण्यासाठी असा करा उपयोग याशिवाय, घरात कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. तसंच, लहान मुलांनाही कधी दक्षिणेकडे पाय करून झोपवू नये. दोन ध्रुवांमधील आकर्षण बलामुळं शरीरातील रक्तप्रवाह, विचार आणि बुद्धीवर विपरीत परिणाम होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)