प्रतिकात्नक फोटो
मुंबई 1 डिसेंबर : एक्ट्रा मॅरेटीअल अफेरच्या बातम्या हल्ली सारख्यास कानावर पडत आहेत. यामध्ये जोडीदाराच्या फसवणूकीमुळे कोणी स्वत:ला संपवलं, तर कोणी दुसऱ्याचा जीव घेतला. शिवाय यासंदर्भात अनेक क्राईमच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. पण मुळात प्रश्न हाच उभा राहातो की लोक एक्ट्रा मॅरेटीअल अफेर्स का करतात? जर एक जोडीदार असेल तर मग दुसऱ्या जोडीदाराची कोणाला गरजच का? यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. तुम्हाला जर ही कारणं माहित करुन घ्यायची असतील तर हे वाचा. आजकाल लोक घरापेक्षा कामावर किंवा ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतात. त्यामुळे सहाजिकच एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपुलकी वाटणे, जिव्हाळा वाटणे सहाजिक आहे. पण तुम्ही खरंच तुमच्या कुटुंबावर प्रेम करत असाल, तर या सगळ्यामध्ये न अडकलेलेच बरे. पण आता प्रश्न असा उपस्थीत राहातो की या सगळ्यातून कसं स्वत:ला लांब ठेवायं? तर तज्ज्ञांनी काही टीप्स दिल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि तूम्ही विवाहबाह्य संबंधांतून व्यवस्थित बाहेर पडू शकता.
एखाद्याशी लग्न झाल्यानंतर जोडीदार जिवंत असताना देखील एखाद्या पुरुषाचं दुसऱ्या महिलेशी किंवा एका महिलेचं दुसऱ्या पुरुषाशी संबंध असणे. हे संबंध शारिरीक किंवा भावनीक असू शकतात. याला Extra Marital Affair किंवा विवाहबाह्य संबंध असं म्हणतात. जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष त्यांच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीशी मानसिक किंवा शारीरिक संबंध ठेवते तेव्हा या संबंधांना समाजात फार गैर मानलं जातं. त्यामुळे समाजात तुमचे स्थानही खालावते. मग आता यामधून बाहेर कसं पडावं किंवा यासगळ्यात कसं पडू नये यासाठी काय करावं लागेल? चला लक्ष टाकू 1. जास्तीत जास्त वेळ जोडीदाराला द्या जर तुम्हाला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमधून बाहेर यायचे असेल तर हळूहळू त्या गोष्टींकडे परत जायला सुरूवात करा ज्यांतून तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत खुश असायचात आणि तणावमुक्त असायचात. कारण जर तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देत नसाल तर तुम्ही विवाहबाह्य संबंधांना बळी पडू शकता. 2. तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा, त्याच्याशी काहीही शेअर करताना घाबरू नका एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे काही लोकांच्या चांगल्या नात्याचा अंत अगदी घटस्फोटापर्यंत होतो. कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावरच टिकतो. त्यामुळे तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा आणि त्याचा विश्वास तोडू नका. हे ही वाचा : तुमचा जोडीदार विवाहबाह्य संबंधात तर नाही ना? ‘या’ गोष्टींवरुन लगेच लागेल पत्ता दुसरी गोष्ट जर तुम्ही तसं केलंच तर, तुमच्या अफेअरबद्दल तुमच्या जोडीदाराला माहिती द्या. घाबरू नका, तुमचा जोडीदार खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल, तर तो तुम्हाला संधी देईल. कदाचित जोडीदार तुमच्यावर रागवेल. भांडणं देखील होतील. पण त्याला परिस्थीती सांगा. समोरील व्यक्ती तुम्हाला नक्की समजून घेईल. तूम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, तूम्हाला तेव्हा काय वाटते आहे याबद्दल तुमच्या पार्टनरशी (partner) शेअर करा, तुम्हाला नक्कीच तुमचा पार्टनरही मदत करेल. भविष्यात अशी चूक परत होणार नाही असा विश्वास तुमच्या पार्टनरला द्या. 3. नेहमीच गोष्टी क्लिअर करा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये अनेक जण आपल्या लग्नाबद्दल गुप्तता पाळताना दिसतात. अनेकदा ते ज्या मुलीशी किंवा मुलाशी अफेअर मध्ये आहेत, त्यांच्याशी आपल्या लग्नाबाबत खरं बोलत नाहीत. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीशी एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअरमध्ये असाल त्यांचाही एकप्रकारे तुम्ही विश्वासघात करता. त्यामुळे एकाच वेळी तुम्ही तिघांची आयुष्य बिघडवत असता तेव्हा असं करू नका आपल्या लग्नाबद्दल किंवा नात्याबद्दल प्रामाणिक असणं फार आवश्यक.
4. काउंसिलरची मदत घ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काउंसिलरची मदत घेऊ शकता. विवाह काउंसिलर देखील असतात, जे तुम्हाला अफेअरमधून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग सांगू शकतील कारण बर्याच वेळा अशी प्रकरणे औपचारिकपणे देखील संबंधित असतात तेव्हा तुमच्या काउंसिलरचा सल्ला नक्की घ्या.