JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mumbai Wholesale Market : जगभरातील सर्व शूज स्वस्तात मिळणारे मुंबईचे मार्केट, पाहा Video

Mumbai Wholesale Market : जगभरातील सर्व शूज स्वस्तात मिळणारे मुंबईचे मार्केट, पाहा Video

Wholesale market in Mumbai : जगभरातील सर्व प्रकारचे शूज अगदी स्वस्त दरात खरेदी करायचे असेल तर तुम्हाला मुंबईचे हे मार्केट माहिती हवे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 2 फेब्रुवारी : रोज बाहेर पडताना बुट घालणे ही फक्त स्टाईल नाही तर गरज बनली आहे. ऑफिसला जाताना, ट्रेकसाठी, लग्नसमारंभात, थंडीपासून बचाव करण्यासाठी, खेळताना वापरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बुट आपल्याला लागतात.  हे बुट ट्रेंडिंग आणि स्टायलिश असावे असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्याचबरोबर याची खरेदी करताना बजेटचीही काळजी घ्यावी लागते.  तुम्हाला ट्रेंडिंग आणि स्टायलिश बुट हवे असतील तर मुंबईतील एका खास जागेची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. कुठं आहे मार्केट? मध्य मुंबईतील कुर्ला स्टेशनच्याबरोबर समोर बुट आणि चप्पलचे होलसेल मार्केट आहे. या ठिकाणी तुम्ही स्वस्त दरात शूजची खरेदी करू शकता. या मार्केटमध्ये इतर रिटेल मार्केटपेक्षा 30 ते 40 टक्के कमी किंमतीमध्ये शूज मिळतात.  कुर्ला भागात असणाऱ्या या मार्केटच्या नावानेच हा परिसर ओळखला जातो. मुंबईच्या सर्व भागातून ग्राहक इथं खरेदी करण्यासाठी येतात. त्याचबरोबर  हे मार्केट परदेशी पर्यटकांसाठी देखील मुख्य शॉपिंग स्पॉट बनलं आहे. या बाजारात 30 - 40 दुकानं आहेत. इथं तुम्हाला प्रत्येक ब्रँडचे बुट मिळतात. त्याचबरोबर लग्नासाठी लागणारे डिझायनर शुज, कोल्हापुरी, मोजडी देखील मिळते. मोठ्या दुकानांमध्ये महाग असणारे बुट इथं स्वस्तात मिळत असल्यानं इथं ग्राहकांची नेहमी गर्दी असते. साधारण 200 रुपयांपासून ते 1 लाखापर्यंतचे शूज इथं मिळतात. पुण्यातील चप्पल आणि शूजचं Wholesale Market कुठं आहे? पाहा Photo बजेट फ्रेंडली शॉपिंग या मार्केटची सुरूवात 30 वर्षांपूर्वी झाली. यापूर्वी कुर्ला स्टेशनच्या बाहेर हे मार्केट होते. पण, तिथं वाहतुकीला अडथळा येऊ लागल्यानं पालिकेनं तेथील बाजार उठवला. त्यानंतर या सर्व विक्रेत्यांनी बाजूला असलेल्या परिसरात आपली दुकानं थाटली, अशी माहिती येथील विक्रेते नितीन कानडे यांनी दिली. या मार्केटध्ये यापूर्वी सेकंड हँड बुट घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असे. आता परिस्थिती बदलली असून इथं ट्रेंडनुसार वेस्टर्न बुट मिळतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.

‘या मार्केटमध्ये तुम्हाला खिशाला परवडतील असे शूज मिळतात.  ब्रँड, नॉन ब्रँड, आग्रा, कानपूर, नोएडा,  मेड इन इंडिया, मेड इन युएसए असा जगभरातील सर्व माल इथं उपलब्ध आहे. या मार्केटमध्ये 40 ते 50 दुकानं असल्यानं हा परिसर एक प्रकारे हब बनला आहे. शो रुममध्ये महाग असणारे बुट स्वस्तात खरेदी करण्यासाठी इथं  रशिया, कोरियासह अनेक देशातील ग्राहक आवर्जून येतात,’ अशी माहिती त्यांनी दिली. Mumbai : सर्वात स्वस्त मार्केटमध्ये करा दागिन्यांची मनसोक्त खरेदी, पाहा Photos ऑनलाईन मार्केटच्या जमान्यातही डोळ्यांनी प्रत्यक्ष खात्री करून शूज खरेदीसाठी इथं ग्राहक येतात. आम्ही देखील बदलत्या काळानुसार या सर्व मालाची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे, असंही कानडे यांनी सांगितलं.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या