JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अन्न विषबाधा झाल्यानंतर घरच्या घरी लगेच करता येण्यासारखे उपाय

अन्न विषबाधा झाल्यानंतर घरच्या घरी लगेच करता येण्यासारखे उपाय

अन्न विषबाधा गंभीर नसेल तर घरगुती उपायांनीही बरे होतात.

जाहिरात

पचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांना किवी खाणं फायदेशीर ठरतं. किवीमधील लॅक्सेटिव पचन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही कमी करतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जेव्हा व्यक्ती खराब किंवा संक्रमित आहार घेते तेव्हा त्यांना अन्न विषबाधा होते. धान्य उगवण्यापासून ते काढणे, साठवून ठेवणे, त्यापासून भोजन बनवणे या कुठल्याही टप्प्यावर ते दूषित होऊ शकते. आहार दूषित होण्याचे कारण म्हणजे हानिकारक जीवजंतूंचा प्रसार आहे. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. केएम नाधिर यांचे म्हणणे आहे की अन्न विषबाधा हा अन्नपदार्थ जनित आजार आहे. हा संसर्ग पसरवणारे विषाणू, जीवाणू किंवा परजीवी यांच्यामुळे दूषित झालेल्या अन्नातून होत असतो. अन्न विषबाधा झाल्यावर व्यक्तीला जुलाब, जीव घाबरणे, पोटदुखी, उलटी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. अन्न विषबाधा गंभीर नसेल तर घरगुती उपायांनीही बरे होतात. पण काही प्रसंगी दवाखान्यात जाणे क्रमप्राप्त होते. अन्न विषबाधा झाल्यावर लोक खायला घाबरतात. पण काही असे अन्नपदार्थ आहेत जे अशी विषबाधा झाली तरी आपण खाऊ शकतो. त्याने पोटाला आराम मिळतो आणि विषारी पदार्थ बाहेर पडायला मदत होते. नारळ पाणी अन्न विषबाधेचे प्रमुख लक्षण आहे उलटी आणि जुलाब होणे. त्यामुळे शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट (कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट आणि सोडियमसारखे क्षार यांना इलेक्ट्रोलाइट्स म्हटले जाते) निघून जातात. त्यामुळे नारळ पाणी शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन ठेवून पोटाला ठिक करण्यास मदत करतात. आले घातलेला चहा अन्न विषबाधेच्या लक्षणांना तात्काळ कमी करण्याचा उत्तम उपाय म्हणजे आले घातलेला चहा. आल्यातील रोगाणू विरोधी द्रव्ये या विषबाधेतून पोटात गेलेल्या जीवाणूशी लढतात आणि बरे करण्यात मदत करतात. चांगला परिणाम होण्यासाठी हा चहा दिवसातून 2-3 तीन कप जरूर प्यावा. दही myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, दही एक प्रकारचे अँटीबायोटिक आहे. त्याचा उपयोग अन्न विषबाधेमध्ये करावा. दह्यामध्ये थोडे काळे मिठ टाकून घेतल्यास फायदा होतो. याशिवाय थोडे पाणी आणि साखर टाकून लस्सीसारखे करूनही पिता येते. लसूण अँटी फंगल गुण असल्याने लसूण खाण्याने पोट दुखण्याची समस्या दूर होते. त्याने जुलाब पण कमी होतात. त्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी पाण्यासोबत लसणाच्या पाकळ्या खाव्या. केळी अन्न विषबाधा झाल्यावर डॉक्टर केळी खाण्याचा सल्ला देतात. त्यात मेद, तंतुमय पदार्थ आणि मसालेदार नसल्याने शरीराची आवश्यकता पूर्ण होते आणि जीव घाबरणे, जुलाब, पोटात दुखणे या समस्या दूर होतात. तुळशी तुळशीमध्ये अनेक औषधी द्रव्ये आहेत. ती स्टॅफिलोकोकस ऑरिससचा विकास रोखते. जे अनेकदा अन्न विषबाधेचे कारण बनतात. तुळशीची पाने खाल्ल्याने पोट दुखी कमी होते. तुळशीचा रस प्यायल्यानेदेखील खूप फायदा होतो. मेथी दाणे मेथीच्या दाण्यांचे सेवन अन्न विषबाधेच्या छातीत जळजळ, अपचन, पोटदुखी, भूक न लागणे आणि जुलाब यांच्यापासून आराम देतात. शरीराच्या चयापचयाची प्रकिया सुधारतात आणि आतड्यांना शांत करतात. मेथीचे दाणे 1-2 मिनिट भाजून आणि मग दळून घ्यावे. ही एक चमचा भुकटी रोज गरम पाण्यासोबत घ्यावी. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - सकस आहार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या-साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या