JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लग्नात स्टायलिश दिसण्यासाठी मॅचिंग बांगड्या तर हव्याच! पाहा काय आहेत पर्याय, Video

लग्नात स्टायलिश दिसण्यासाठी मॅचिंग बांगड्या तर हव्याच! पाहा काय आहेत पर्याय, Video

लग्नसराई सुरु असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 डिसेंबर :  बांगडी म्हणजे स्त्रियांच्या शृंगाराचा एक अविभाज्य भाग आहे. बांगड्यांशिवाय शृंगार पूर्ण होत नाही. कोणतही शुभ कार्य असलं की स्त्रियांचा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो. लग्न, मुंज यांसारख्या कार्यक्रमात घरातील, नात्यातील, शेजारपाजारच्या सर्व स्त्रियांना अगदी लहान मुलींना देखील आवर्जून बांगड्या भरण्यासाठी आमंत्रण दिले जाते. ज्यांच्याकडे कार्यक्रम आहे त्यांच्याकडून सर्वांना नव्या बांगड्या भेट दिल्या जातात. यावर्षी मुंबईच्या बाजारात कोणत्या बांगड्यांचा ट्रेंड आहे पाहुयात. कोणत्या बांगड्यांचा आहे ट्रेंड? लग्नसराई सुरु असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काचेच्या आणि मेटलच्या बांगड्यावर वेलवेटचे कोटिंग असलेल्या बांगड्यांची जोरदार विक्री होत आहे. तसंच या बांगड्यामध्ये इतर कोणत्याही बांगड्या सेट करून घालता येतात त्यामुळे या बांगड्यांचा वापर मल्टीपर्पज पद्धतीने होतो. नवरीसाठी खास चुडा बाजारात लग्नसमारंभात सौभाग्य अलंकार म्हणून नववधू चुडा भरतात.  लग्नात हिरवाचुडा घातला जातो. आता लाल चुडासुद्धा घालण्याची फॅशन रुढ झाली आहे. या चूड्यावर वेगळी डिझाईन किंवा फोनेटिक हवा असेल तर तसे बनवून मिळतात. बांगडी, बाजूबंद, हार आणि बरंच काही… मोत्याच्या दागिन्यांचा थाट अन् लग्नात तुमचीच हवा पंजाबी वधू लाल आणि पांढऱ्या रंगाचा चुडा भरतात. बंगाली आणि उडिया नववधू शंखा पोला घालतात. पांढऱ्या बांगडीला  शंखा तर लाल बांगडीला पोला म्हणतात. राजस्थान आणि गुजरातमधील वधू 52 बांगड्या भरतात. त्यांच्या चुड्याला “हस्तिदंती चुडा” म्हणतात.

काय आहे किंमत? वेलवेटच्या बांगड्या 30 रुपये ते 60 रुपये डझनच्या भावाने विकल्या जातात. याच बांगड्यांचा जर पूर्ण सेट करून घ्यायचा असेल तर 100 रुपये ते 150 रुपये सेट प्रमाणे विक्री होते. महाराष्ट्रीयन चूड्याचा सेट 400 रुपये ते 600 रुपयांपर्यंत मिळतो. लाल पांढऱ्या बांगड्यांच्या चुड्याचा सेट 500 ते 1500 रुपयांपर्यंत मिळतो. या चूड्यावर वधू वराचे नाव तसेच फोटो लावून मिळतो. कस्टमाईज पद्धतीने आपण हा सेट घेऊ शकतो. लग्नात साडीवर मॅचिंग ब्लाऊज हवंच! मुंबईत हा ट्रेन्ड आहे सुपरहिट सध्या वेलवेटच्या बांगड्यांचा ट्रेंड सुरु आहे. ग्राहकांना पाहिजे तो रंग आम्ही उपलब्ध करून देतो तसेच या बांगड्या जास्त महाग नसल्यामुळे व नवीन प्रकार असल्यामुळे ग्राहकांचा याला चांगला प्रतिसाद आहे, असं दादर मार्केटमधील बांगडी विक्रेते अभय मिश्रा यांनी सांगितलं.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या