JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हृदयासाठी उत्तम आहे अक्रोड; पण खाण्याची वेळ, पद्धत आणि प्रमाणही आहे महत्त्वाचे

हृदयासाठी उत्तम आहे अक्रोड; पण खाण्याची वेळ, पद्धत आणि प्रमाणही आहे महत्त्वाचे

अक्रोड (walnut) कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. अधिक प्रमाणात खाल्लं तर अनेक समस्यांचा धोका असतो.

जाहिरात

Top view of a brown bowl filled with organic walnuts shot on rustic wood table. Some almonds are out of the bowl on a burlap. Predominant color is brown. DSRL studio photo taken with Canon EOS 5D Mk II and Canon EF 100mm f/2.8L Macro IS USM

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ज्याचं हृदय तंदुरुस्त तितकं त्याचं शरीर तंदुरुस्त असतं. म्हणून त्या उपायांचा अवलंब केला पाहिजे ज्याने हृदयाचे आरोग्य चांगलं राहिल. व्यक्ती जे खातो त्याचा परिणाम त्याच्या शरीराबरोबरच त्याच्या हृदयाच्या आरोग्यावर होत असतो. आपल्या आहारात म्हणूनच अशा खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे जे आपल्या शरीरासोबत हृदयाचे स्वास्थ्य पण चांगलं ठेवतील. सुकामेवा संपूर्ण शरीराच्या स्वास्थ्यालादेखील फायदा देतं. म्हणून अक्रोड आपल्या आहारात सामील करायला हवं. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, सुक्यामेव्यात फक्त पोषक घटकच भरपूर प्रमाणात नसतात तर त्या सोबत त्यात अनेक बायोएक्टिव घटक पण असतात जे शरीराला तंदुरुस्त ठेवण्यात मदत करतात. अक्रोड मेंदूसोबत हृदयासाठी पण फायद्याचं असतं. ते हृदयाचं कार्य संचालित आणि नियमित करतं त्यासोबत त्यात सुधारपण करत असतं. अक्रोडमध्ये ओमेगा फॅटी एसिड अधिक प्रमाणात असतं ज्याचा कार्डियोवस्कुलर सिस्टमला खूप लाभ होतो. ओमेगा 3 फॅटी एसिड शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं जे हृदयासाठी लाभदायक असतं. एक अक्रोड खाण्यानं रक्तदाब कमी होतो, असं आढळून आलं आहे. म्हणून उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी ते रोज खाल्लं पाहिजे. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांनी सांगितलं,  उच्च रक्तदाबामध्ये उच्च दबावामुळे रक्त पंप करावं लागल्यानं हृदयाचे स्नायू जड होतात. त्यामुळे या शरीराची गरज पूर्ण करण्यात अडचण येते, ते योग्य प्रमाणात रक्त पंप करू शकत नाहीत त्याने हृदयक्रिया थांबू शकते. हे वाचा -  तुमच्यामध्ये iodine ची कमी तर नाही ना? शरीर देतंय 5 संकेत अक्रोडमध्ये जीवनसत्व बी, तंतुमय पदार्थ, मॅग्ननेशियम आणि एंटीऑक्सिडंट जसे व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असतं. अक्रोड प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. अक्रोड सूज नियंत्रित करतं, वजन घटवतं, हे सर्व गुण एकत्रितपणे हृदयाचं स्वास्थ्य चांगलं करण्यास मदत करतं. किती आणि केव्हा खावं अक्रोड अक्रोडमध्ये calorie जास्त असतात, त्यामुळे ते कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. अधिक प्रमाणात खाल्लं तर वजन वाढण्याचा धोका असतो. अक्रोडचे अधिक सेवन हगवणीचं कारण होऊ शकते. लोकांना वाटतं त्यात फॅट खूप प्रमाणात असतात, आणि त्यानं वजन वाढेल पण जर मर्यादित प्रमाणात अक्रोड खाल्ले तर वजन कमी करायला मदत होते कारण योग्य प्रमाणात प्रथिने, फॅट, आणि कैलरी मिळतात. रोज एक ते दोन अक्रोड सकाळी आणि संध्याकाळी नाश्त्यामध्ये खाल्ले तर चालतात. एका दिवसात पाचपेक्षा जास्त अक्रोड शरीरासाठी नुकसानदायक ठरतात, कारण ते गरम पडतात आणि ताप येणं, तोंड येणं यासारखे आजार होऊ शकतात. कफ असेल तर अक्रोड खाऊ नये. रिकाम्यापोटी अक्रोड खाऊ नये. अक्रोडच्या तेलानं काही दिवस पोटात जळजळ होऊ शकते. हे वाचा -  केसांमधील उवांमुळे हैराण झाला आहात? घरच्या घरी तयार करा हे रामबाण औषध अक्रोड खाण्याची योग्य पद्धत म्हणजे त्याला केळं किंवा दही यामध्ये एकत्र करून खावं. त्याशिवाय सलाडसोबत पण अक्रोड खाता येतं. त्यात तुम्ही लिंबाचा रस, लसूण, आले, ऑलिव्ह तेल, मीठ, आणि काळे मिरेपूड टाकू शकता. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - मेंदुत संसर्ग: लक्षणे_,_ कारणे… न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या