JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Veg की Nonveg : तुम्ही काय खाता, यावरही अवलंबून आहे कोरोनाचा धोका

Veg की Nonveg : तुम्ही काय खाता, यावरही अवलंबून आहे कोरोनाचा धोका

आपले आरोग्य उत्तम असेल आणि इम्युनिटी (Immunity) चांगली असेल तर कोरोनाचा धोका तुलनेने कमी असतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जून : कोरोनामुळे (Corona) लोक आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देऊ लागले आहेत. आपले आरोग्य उत्तम असेल आणि इम्युनिटी (Immunity) चांगली असेल तर कोरोनाचा धोका तुलनेने कमी असतो. त्यामुळे हेल्दी डाएट (Healthy diet), व्यायामाकडे लोकांचा कल वाढतोय. यातच एक महत्वाची बाब समोर आलीए. मांसाहारी (Non vegetarian) लोकांच्या तुलनेत शाकाहारी (Vegetarian) लोकांना कोरोनाच्या गंभीर संक्रमणाचा धोका 73 टक्क्यांनी कमी असल्याचं सांगण्यात येतंय. याबाबत मे महिन्यात बीएमजे मेडिकल जर्नलमध्ये एक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासात म्हटलंय की, शाकाहारी लोक जे फळं (fruits), पालेभाज्या नियमितपणे खातात, तसेच सी फूड (sea food) खाणारे मांसाहारी लोक यांच्याशिवाय बाकी लोकांना कोरोनाच्या गंभीर संक्रमणाचा धोका होऊ शकतो. फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेतील 2,884 हेल्थ केअर वर्कर्सवर हा अभ्यास करण्यात आला होता. तर, शाकाहारी आणि सी फूड खाणाऱ्या लोकांना कोरोनाचं गंभीर संक्रमण होण्याचा धोका 59 टक्के कमी होता. तर, लो कार्बोहायड्रेट आणि हाय प्रोटीन डाएट घेणाऱ्यांमध्ये कोरोनाचा धोका शाकाहारी लोकांच्या तुलनेत तीन पटीने जास्त आहे. शास्त्रज्ञांनी हा अभ्यास करताना वय, लिंग, कास्ट, मेडिकल स्पेशिलिटी, बॉडी मास इंडेक्स, मेडिकल कंडीशन, धूम्रपान आणि एक्झरसाइझ या सर्व बाबींना देखील गृहीत धरलं होतं. यामध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त व्हॉलेंटियर्स पुरुष होते आणि 95 टक्के डॉक्टर होते. या अभ्यासात झोप आणि तणाव या घटाकांचाही विचार करण्यात आला होता. कॅल्डर याबाबत म्हणाले की, लोकांच्या इम्युन सिस्टमला बऱ्याच गोष्टी प्रभावित करतात. त्यापैकी डाएट एक आहे, सर्वस्वी नाही. हे वाचा -  भाग्यश्री पन्नाशीतही दिसते तितकीच सुंदर; Beauty secret सांगणारा तिचा VIDEO मानवी शरीरात मायक्रोन्युट्रियंट आणि मॅक्रोन्युट्रियंट या दोन पोषक तत्वांची गरज असते. ही पोषक तत्व शाकाहारी जेवणात मिळतात. मायक्रोन्युट्रियंट म्हणजे व्हिटॅमिन आणि मिनरल. हे आपल्या शरीरातील इम्यून सिस्टम मजबूत करते. तर, मॅक्रोन्युट्रियंट आपल्याला एनर्जी देतात. ज्यामुळे कोणत्याही अडचणींशिवाय आपलं शरीर काम करतं. मॅक्रोन्युट्रियंटची विभागणी कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट या तीन प्रकारांत करण्यात येते. कोरोना आल्यापासून डब्लूएचओकडून (World Health Organization) लोकांना फळं, पालेभाज्या (डाळी, चणे, बीन्स, वाटाणे) नट्स, कडधान्ये ब्राउन राइस, ओट्स, बाजरा, ज्वारी आणि अॅनिमल सोर्स फूडचा समावेश असलेलं डाएट घेण्याचा सल्ला दिला जातोय. प्रत्येकाने दिवसाला किमान 400 ग्रॅम फळं आणि भाजी खाणं गरजेचं आहे, असं WHO म्हणतंय. हे वाचा -  फक्त मिसळा दोनच पदार्थ; तुमचा साधा चहाही होईल इम्युनिटी बुस्टर आपल्या शरीराला एएलए, डीएचए आणि ईपीए या तीन प्रकारच्या ओमेगांची गरज असते. ओमेगा-3चे सेवन केल्याने शरीरातील ओमेगाची गरज पूर्ण होते. ओमेगा एलए (Omega LA)वनस्पती आणि तेलांमध्ये आढळतो. तर डीएचए (DHA) फक्त मासे आणि शेवाळात आढळतो. शाकाहारी आणि व्हेगन लोक अल्गीपासून तयार होणारे पदार्थ सेवन करून ओमेगाची गरज पूर्ण करू शकतात. ओमेगाचे सेवन केल्याने कोरोनाचा धोका कमी होतो. शिवाय श्वसनासंबंधी आणि किडनीसंबंधी आजारांसाठी प्रतिकार करण्यासाठी उपयोग होतो. यावर्षी मार्च महिन्यात जर्नल ऑफ ट्रान्सलेशनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनाचं गंभीर संक्रमण झालेल्या रुग्णांना दोन आठवडे 400 मिलीग्राम ईपीए आणि 200 मिलीग्राम डीएचए असलेली 1000 मिलीग्राम ओमेगा-3 औषधं देण्यात आली. त्यानंतर या रुग्णांचा सर्व्हायव्हल रेट 21 टक्क्यांपर्यंत वाढला. आपण जेवण केल्याने आपल्या शरीरातील मायक्रोबायोम म्हणजेच जीवाणू, फंगस आणि व्हायरस या सुक्ष्मजीवांना देखील अन्न मिळतं. ब्रिटनमधील मँचेस्टर यूनिव्हर्सिटीमध्ये इम्यूनोलॉजिस्ट असलेल्या शीना क्रुयकशांक म्हणतात की, हे सूक्ष्म जीव आपल्या शरीरातील अन्न पचवण्यात मदत करतात. तसेच शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन तयार करतात. आपल्याला अनेक इन्फेक्शनपासून वाचवतात आणि आपली इम्युनिटी मजबूत करण्याचं काम करतात. शीना यांनी पुढे सांगितलं की, मायक्रोबायोम पोटाच्या बाह्य काठाच्या पेशींना एक मजबूत बॅरिअर बनून तिथे वाढणार्‍या सूक्ष्मजंतूपासून आपले रक्षण करते. तसेच आपल्या आतड्यांमध्ये कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजीव राहायला पाहिजे, हे ठरवण्यात आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो, असं त्यांनी सांगितलं. हे वाचा -  Explainer : आधी वगळलं आणि आता प्रेग्नंट महिलांच्या कोरोना लसीकरणासाठी धडपड का? रेझिस्टंट स्टार्चसारखे फायबर - शिजवलेले पण थंड बटाटे आणि तांदूळ, बीन्स किंवा डाळीसारखे फायबर बॅक्टेरियासाठी चांगलं अन्न असतं. प्रोबायोटिक पदार्थांमध्ये जिवंत फायदेशीर बॅक्टेरिया असतात. यीस्टयुक्त पदार्थ शरीरासाठी चांगले असतात. त्यामध्ये केफिर, दही, किमची, मिझो, कोबीचे लोणचे, इतर भाजीपाल्यांच्या लोणच्यांचा समावेश आहे. हे सर्व पदार्थ आपल्या पोटाला आरोग्यवान ठेवतात. त्यामुळे आपलं शरीर कोरोनाविरोधात इम्युनिटी तयार करून आपलं रक्षण करतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या