JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हसतं-खेळतं, आनंदी राहतं कुटुंब; वास्तुशास्त्रानुसार घरात या मूर्ती ठेवायला विसरू नका

हसतं-खेळतं, आनंदी राहतं कुटुंब; वास्तुशास्त्रानुसार घरात या मूर्ती ठेवायला विसरू नका

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये थोडासा बदल केला तर खूप फायदा होऊ शकतो. घरामध्ये काही वस्तू ठेवल्यामुळे देखील पॉझिटिव्ह एनर्जी वाढायला लागते. जाणून घेऊयात काही वास्तूशास्त्राचे उपाय.

जाहिरात

3. गंगाजल- हिंदू धर्मात गंगाजलाचे विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. हिंदू धर्मात गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे पूजास्थळी गंगाजल अवश्य ठेवावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 एप्रिल : घरामध्ये सुख शांती नांदावी असं वाटत असेल तर, वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra)  काही उपाय केल्याने फायदा होऊ शकतो. कधीकधी सगळ्या गोष्टी चांगल्या असूनही सुद्धा संकटांची मालिका संपत नसते. हाती घेतलेल्या कामांमध्ये अडचणी (Difficulties in Work) येत असतात किंवा घरामध्ये शांतता (Peace) नांदत नाही. सतत आजारपण येत राहतात. अशा वेळेस काय उपाय करावेत असा विचार मनात यायला लागतो. थोडासा बदल वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये केला तर, खूप फायदा होऊ शकतो. घरामध्ये काही वस्तू ठेवल्यामुळे देखील पॉझिटिव्ह एनर्जी वाढायला लागते. जाणून घेऊयात काही वास्तू उपाय (****Vastu Remedies). हत्तीची मूर्ती हत्तीला धन आणि ऐश्वर्याचे प्रतिक मानलं जातं. हत्ती गजलक्ष्मीचं वाहन आहे. त्यामुळे सुख-समृद्धी प्रदान करण्यासाठी  महत्वाचं मानलं जातं. हत्तीची मूर्ती घरात ठेवल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहते. हत्तीची मूर्ती उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवणं अधिक शुभ मानलं जातं. शिवाय आपल्या बेडरूममध्ये हत्तीची चांदीची मूर्ती ठेवली तर, राहूचा वाईट परिणाम कमी होतो. आपल्याला हत्तीची मूर्ती ठेवणे शक्य नसेल तर, हत्तीचा फोटो देखील लावू शकता. राजहंस हंसाला प्रेम आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं. हंसाची जोडीची मुर्ती मुख्य खोलीत किंवा हॉलमध्ये ठेवली तर, आर्थिक फायदे मिळतात. याशिवाय घरात प्रेम आणि शांततेचं वातावरण तयार होतं. घरामध्ये बदकांची मूर्ती ठेवली तर, पती-पत्नीचे संबंध प्रेमळ बनतात. हे वाचा -  30 वर्षांनंतर शनिदेवांची स्वारी येतेय स्वराशीत; या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी कासव घरामध्ये कासव असणं अतिशय शुभ मानलं जातं. काही लोक फिश टॅंकमध्ये देखील कासव ठेवतात. पौराणिक कथांनुसार कासवाला विष्णूचं रूप मानलं जातं आणि त्यामुळे अनेकांना घरामध्ये ठेवायला आवडतं. घरात जिवंत कासव ठेवणं अशक्य आहे. त्यामुळेच उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवू शकतात. याचा परिणाम शुभ होतो. घरामध्ये मुख्य खोलीमध्ये दरवाजाकडे तोंड करून कासवाची धातूची मूर्ती ठेवणं उत्तम मानलं जातं. शक्य असेल तर चांदीची कासवाची मूर्ती ठेवणं लाभदायक आहे. हे वाचा -  Healthy राहण्यासाठी नक्की खायला हवेत हे 5 Vegetarian Food; मिळतात अनेक फायदे पोपटाची मूर्ती घरामध्ये पोपटाची मूर्ती ठेवण प्रेम आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. पोपटाची मूर्ती किंवा फोटो मुलांच्या खोलीमध्ये लावल्याने त्यांची एकाग्रता वाढून अभ्यासामध्ये मन लागतं. फेंगशुईनुसार पोपट पृथ्वी,अग्नी,जलद,लाकूड आणि धातू यांचं प्रतीक आहे. घरात पोपोट पाळणं किंवा पोपटाची मूर्ती ठेवली तर, वैभव वाढायला सुरुवात होते. घरातलं वातावरण आनंदी राहतं. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या