घरात असलेल्या काही निरुपयोगी गोष्टी घरात नकारात्मकता पसरवत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
दिल्ला, 21 जून : आपण खुप प्रेमाने आपलं घर सजवतो, विविध रंगांनी, पडद्यांनी घरांची सजावट करतो. शोच्या वस्तू घरामध्ये आणतो. पण,घरात शांतता आणि सुख नांदत नसेल तर त्या घरात कधीच आनंद मिळत नाही. काही वास्तूशास्त्रानुसार (Vastushastra) वास्तूदोषामुळे पती-पत्नीमध्ये वाद होतात. घर सुंदर असेल मात्र, घरात प्रेमाचं आणि शांततेचं वातावरण नसेल. पती-पत्नीमध्ये सतत विनाकारण वाद (Quarrel Between Husband & Wife) होत असतील तर, त्या घरात राहण्याची इच्छाही होत नाही. सतत निगेटिव्ह एनर्जी (Negative Energy) असल्याचा आभास निर्माण होतो. याला त्या घरातला वास्तुदोष कारणीभूत असू शकतो. वास्तुदोषामुळेच नकारात्मकता, चिडचिड आणि भांडणं वाढायला लागतात. सतत आपल्या जोडीदाराबरोबर वाद होत असतील तर, काही छोटे वास्तू **(**Vastu Remedies) उपाय केल्याने फरक पडू शकतो. पुजाअर्चा करावी घरामध्ये वास्तूदोष असेल तर, पूजाअर्चा, होमहवन करा. त्यामुळे घरातलं वातावरण शुद्ध होतं आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते. याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करावी,दिवा लावावा. शक्य असेल तर घरातल्या लोकांनी एकत्र बसून पूजा करावी. ( साप्ताहिक राशीभविष्य: पौर्णिमा कुठल्या राशीला ठरणार फलदायी? ) तुळस घराच्या पूर्व दिशेला तुळशीच रोप जरूर ठेवावं. तुळशीसमोर सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा. या छोट्याशा उपायदेखील घरातले वास्तूदोष दूर होतात दरवाजे घराल 2 दरवाजे असतील तर, बऱ्याच जणांना मागचा दरवाजा वापरायची सवय असते. मात्र, असं न करता मुख्य दरवाजाचा वापर येण्या-जाण्यासाठी करावा. ( Ease Of Living Index: भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कुठलं? पाहा मुंबई कुठे? ) पौर्णिमा वास्तूशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. या दिवसाला शुभ मानला गेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये गंगाजल शिंपडावं. यामुळे नकारात्मकता संपते. मीठ नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी जाड मीठ वापराव. हे मीठ पाण्यात टाकून लादी पुसण्यासाठी करावं. यामुळे घरातले बॅक्टेरिया तर संपतात शिवाय सकारात्मक ऊर्जा येते. ( या 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का? ) लाफिंग बुद्धा पॉजिटीव्ह एनर्जीसाठी फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धाला अतिशय महत्त्व आहे. ज्या घरामध्ये लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवली जाते. त्या घरात नेहमीच आनंदी आनंद नांदतो. घरात कासव ठेवावं तांब किंवा पितळेचा कासव घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. हे कासव घरात उत्तर दिशेला पाण्याच्या भांड्यांमध्ये ठेवावं. त्यामुळे घरातल्या समस्या संपून, घरांत संपत्ती यायला सुरुवात होते.