JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिसमधल्या जिन्याची रचना कशी असावी?

वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिसमधल्या जिन्याची रचना कशी असावी?

वास्तुशास्त्रानुसार, घर किंवा ऑफिसमधला जिना हा प्रगतीसाठी पूरक ठरत असतो. तो योग्य दिशेला असेल तर शुभफलदायी ठरतो

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 09 नोव्हेंबर : जीवनात सुख-समृद्धी, यश आणि पैसा मिळावा, घर आणि व्यवसायाच्या ठिकाणी वातावरण सकारात्मक राहावं, असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी काही जण ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र अभ्यासकांचा सल्ला घेतात. घर किंवा ऑफिसची रचना सदोष असेल, तिथल्या वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्या असतील तर सुख-समृद्धी लाभत नाही. त्यामुळे घर किंवा ऑफिस बांधताना वास्तुशास्त्रातल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. वास्तू अर्थात घर किंवा ऑफिसमधला जिना चुकीच्या दिशेला असेल तर दुःख, दारिद्र्य वाढतं. जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. घर किंवा ऑफिसमधला जिना योग्य दिशेला असेल, तर तो उन्नतीस पूरक ठरतो. त्यामुळे घर किंवा ऑफिसमध्ये जिना कोणत्या दिशेला असावा, तो कसा असावा याविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, घर किंवा ऑफिसमधला जिना हा प्रगतीसाठी पूरक ठरत असतो. तो योग्य दिशेला असेल तर शुभफलदायी ठरतो. जिना चुकीच्या दिशेला असेल, त्याची रचना योग्य नसेल तर प्रगती खुंटते. जीवनात संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे घर किंवा ऑफिस बांधताना जिना योग्य दिशेला आहे की नाही याची खात्री करणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्र अभ्यासकांच्या मते, घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला जिना असणं अत्यंत शुभ मानलं जातं; मात्र काही कारणांमुळे या दिशेला जिना बांधणं शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम, नैर्ऋत्य, मध्य दक्षिण किंवा वायव्य दिशेला जिना बांधू शकता; मात्र जिन्याची उत्तर दिशेकडून सुरुवात होऊन तो दक्षिण दिशेला संपणारा असावा. घरातला जिना वास्तुशास्त्रानुसार नसेल तर त्यासंबंधीचा दोष दूर करण्यासाठी स्वस्तिकाशी निगडित उपाय करू शकता. जिन्यासह त्याच्या भिंतीवर कुंकवाचं स्वस्तिक काढल्यास तिथले वास्तुदोष दूर होतात. जिन्याखाली चुकीच्या पद्धतीने बांधकाम केलं असेल तर त्याचा दुष्प्रभाव नष्ट करण्यासाठी तिथे तुळस ठेवावी. काही जण घर बांधताना वास्तुशास्त्रातल्या नियमांकडे दुर्लक्ष करून घरात जिना बांधतात. यामुळे दोष निर्माण होतात आणि नकारात्मकता पसरू लागते. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थानी जिना नसावा. या ठिकाणी जिना असेल तर घरात दारिद्र्य येतं असं मानलं जातं. अनेक जण घरात डिझाइन आणि लुक्सचा विचार करून वळणदार जिना बांधतात; मात्र वास्तुशास्त्रानुसार असा जिना अशुभ मानला जातो. त्यामुळे घरातला जिना सरळ असावा. त्याच्या दोन्ही बाजूंना दरवाजा असावा. वास्तुशास्त्रानुसार, डिझाइन आणि दिशेसोबत जिन्याच्या पायऱ्यांची संख्यादेखील महत्त्वाची असते. जिन्याला 5,7,9, 11,15,17 अशा विषम संख्येत पायऱ्या असाव्यात.

काही जण जिना बांधल्यानंतर त्याच्या खाली अनावश्यक साहित्य ठेवतात; मात्र वास्तुशास्त्रानुसार, जिन्याखालची जागा नेहमी रिकामी ठेवावी. तसंच जिन्याखाली किचन, बाथरूम किंवा देवघर चुकूनही नसावं. या गोष्टी जिन्याखाली असतील तर घरात अनेक अडचणी निर्माण होतात, असं वास्तुशास्त्राचे जाणकार सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या