वॉशिंग्टन, 30 डिसेंबर : अमेरिकेतील (America) नवनिर्वाचित खासदाराचा कोरोनामुळे (coronavirus) मृत्यू झाला आहे. रिपब्लिकन खासदार ल्युक लेटलो (Luke Letlow) यांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. रविवारीच ते शपथ घेणार होते. 18 डिसेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती इतकी बिघडली की मंगळवारी त्यांचं निधन झालं. लेटलो यांनी आपल्याला कोव्हिड - 19 झाल्याचं सांगितलं होतं. 18 डिसेंबरला त्यांनी ही माहिती दिली होती. उत्तर लुसियानातील रिचलँड पॅरिशमधी आपल्या घरात ते आयसोलेट झाले होते. पण 19 डिसेंबरला त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात भरती करावं लागलं.तिथं त्यांची प्रकृती आणखी ढासलळली. त्यानंतर 23 डिसेंबरला त्यांना श्रेवेपोर्टमधील एका रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 41 व्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यामागे त्यांची पत्नी जुलिया बरनहिल लेटलो आणि दोन लहान मुलं आहेत.
याच वर्षात लुइसियानातील पाचव्या काँग्रेससाठी त्यांची संयुक्त राज्य अमेरिकेचे हाउस ऑफ रिप्रेजेन्टेटिव्स म्हणून निवडण्यात आलं होतं. लुसियानामध्ये कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती खूप बिघडली होती. लेटलो स्वतः सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी वारंवार सांगायचे. पण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते बहुतेक वेळा मास्क न घालताच दिसले. निवडणूक प्रचारात ते कधी मास्क घालायचे तर कधी नाही. ऑक्टोबरमध्ये एका कँडिडेट फोरमनं त्यांना अर्थव्यवस्था ढासळल्याचं सांगितलं तेव्हा सर्व प्रतिबंध हटवण्याचंही त्यांनी समर्थन केलं होतं. कोव्हिड-19 मुळे मृत्यू झालेले लेटलो हे अमेरिकेतील राजकारणातील उच्च नेते होते. लुइसियानाचे गव्हर्नर जॉनल बेल एडवर्ड्स यांनीही ट्विचरवर शोक व्यक्त केला.