JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / धक्कादायक! गाढवाची लीद आणि भुसा वापरून बनवले जातात मसाले, छापा पडल्यावर झाला भांडाफोड

धक्कादायक! गाढवाची लीद आणि भुसा वापरून बनवले जातात मसाले, छापा पडल्यावर झाला भांडाफोड

भेसळीचा एक अत्यंत विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. मसाल्यांचा कारखाना चालवताना भेसळ करण्यासाठी वापरलेल्या गोष्टी पाहून पोलीसही चक्रावले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हाथरस (उत्तर प्रदेश), 16 डिसेंबर : भेसळ (adulteration) हा अन्नधान्याच्या बाजारातला भ्रष्टाचार. भेसळ करायला वर्षानुवर्षे अनोख्या युक्त्या शोधल्या जातात. ही भेसळ निरुपद्रवी वाटत असली तरी अनेकदा भेसळीतून विषबाधा होण्याचे प्रकारांनी घडलेले आहेत. आता मात्र एक अजूनच विचित्र आणि किळसवाणी गोष्ट समोर आली आहे. युपीमधल्या (up) हाथरस इथं पोलिसांनी (up police) सोमवारी रात्री एका कारखान्यात छापा मारला. नकली मसाल्यांचं मोठं रॅकेटच इथं उघड झालं. कारखान्यातले लोक स्थानिक ब्रँड उभा करण्याच्या नावाखाली नकली मसाले बनवत होते. चक्क गाढवाची लीद, ऍसिड आणि भुसा वापरून हे मसाले बनवले जायचे. पोलिसांनी छाप्यामध्ये 300 किलोग्रॅमहून अधिक मसाला जप्त केला आहे. नकली मसाला कारखान्याचा मालक अनूप वाष्णेर्यला पोलिसांनी अटक केली असून तो ‘हिंदू युवा वाहिनी’च्या मंडल प्रहरी पदावर आहे. हाथरसच्या नवीपूर भागातल्या या कारखान्यावर छापा मारला तसं  धनिया पावडर, लाल मिर्ची पावडर अशा अनेक मसाल्यांची पाकिटं सापडली. सोबतच मसाल्यांचा मोठा साठाही विक्रीसाठी ठेवलेला होता.

पोलिसांनी मसाल्याचे 27 नमुने परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. संयुक्त न्यायाधीश प्रेम प्रकाश मीणा यांनी सांगितलं, की कारखान्याचा मालक वाष्णेर्यला सीआरपीसी कलम 151 अंतर्गत न्यायिक कोठडीत पाठवलं आहे. परिक्षणाचे नमुने आल्यानंतर ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यां’तर्गत गुन्हा नोंदवला जाईल. त्यांनी सांगितलं, की बऱ्याच काळापासून येत असलेल्या तक्रारीच्या आधारे फुड इन्स्पेक्टरला सोबत घेऊन ही कारवाई केली गेली. याचसोबत युपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सनं भारतीय रेल्वेची तत्काळ तिकिटं विकणाऱ्या एका रॅकेटचा भांडाफोड केला. आणि सद्दाम हुसेन अन्सारी  या रॅकेटच्या मास्टरमाईंडलाही त्यांनी बस्ती जिल्ह्यातून जेरबंद केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या