आयुर्वेदिक औषधात त्रिकटु चूर्णचा वापर बर्यापैकी केला जातो. नावाप्रमाणेच त्रिकटु हे तीन मसाल्यांचं किंवा औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे ज्याचा तीव्र परिणाम होतो. हे पिंपळी किंवा लांब मिरची, मिरपूड आणि कोरडं आले किंवा सुंठ यांचं मिश्रण आहे. पाचक अग्नीला उत्तेजना देण्यासाठी तीन औषधी वनस्पती एकत्र काम करतात.यामुळे पचन प्रक्रिया सुधारते आणि पित्त प्रवाह योग्य राहतो. यकृताच्या शुद्धीकरणासाठी देखील मदत होते. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, पचन आणि श्वसन आरोग्याशी संबंधित विविध रोग आणि रोगांच्या उपचारांमध्ये त्रिकटु चूर्ण महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. घशातील संक्रमण, त्वचारोग, सायनुसायटिस, जळजळ किंवा गॅस तयार होणं आणि दमा यांच्या उपचारांसाठी हे फायदेशीर आहे. त्रिकटुमध्ये आंल्कॅलोइड पाइपेरिन असतं ज्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. पचन वाढवतं त्रिकटु अन्न पचन सुधारत. तसंच पोषक द्रव्यांचं शोषण वाढवतं. दोन सक्रिय संयुगे पाइपेरिन आणि जिंझरोल पचन एन्जाइमांना उत्तेजित करतात यामुळे पचनप्रक्रिया सुरळीत राहते. पचन समस्या असलेल्यांनी जेवणाच्या एक तासापूर्वी अर्धा ते एक चमचा हे चूर्ण घ्यावं. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त सुधारित पचन वजन नियंत्रित करण्यात मदत करतं. चयापचय वाढवण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. त्रिफळा बरोबर याचं सेवन केल्यास वजन कमी होईल. यासाठी जेवण करण्यापूर्वी अर्धा तास एक चमचा त्रिकटु पावडर घ्या. कोलेस्ट्रॉल****ची पातळी कमी करतं त्रिकटु एक शक्तिशाली हायपोलिपिडेमिक एजंट आहे. या औषधी वनस्पतीमध्ये एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल, एकूण कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइडची पातळी कमी करण्याची क्षमता आहे. यामुळे एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढते. त्रिकटु लिपिड प्रोफाइल व्यवस्थितित करण्यास तसंच हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं. जेवण करण्यापूर्वी अर्धा ते एक चमचा त्रिकटु पावडर घ्या. थायरॉईडसाठी त्रिकटु पावडर थायरॉईडच्या उपचारात देखील उपयुक्त ठरू शकतं. 10 ग्रॅम गोदंती भस्म 50 ग्रॅम त्रिकटु पावडरमध्ये मिसळा आणि एक ते 2 ग्रॅम मधासह दिवसातून दोनदा घ्या. अस्थमा****मध्ये फायदेशीर श्वसन रोग आणि दम्याच्या त्रासात खूप फायदेशीर आहे. दमा, सायनस आणि ब्रॉन्कायटीससारख्या रोगांसाठी त्रिकटुचा वापर केल्याने फुफ्फुसातून श्लेष्मा कमी होतो कारण त्याचा परिणाम तीव्र असतो. जेवण करण्याच्या अर्धा तास आधी अर्धा चमचा त्रिकटु पावडर मधासोबत घ्या. रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी myupchar.com शी संबंधित डॉ. आकांक्षा मिश्रा यांनी सांगितलं, त्रिकटु पावडर रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करतं. याचं सेवन केल्यानं शरीरात अग्नी प्रदीप्त होतो, ज्याने पचन योग्य होते आणि भूक वाढते. जे लोक सारखे सारखे आजारी पडतात त्यांनी दररोज झोपायच्या आधी एक चमचा त्रिकटु पावडर घ्यायला हवी. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - दमा: लक्षणे, कारणे, उपचार, औषध… न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._