मुलाच्या गळ्यात नाणं अडकलंय? लगेच करा हे उपाय, नाहीतर...
मुंबई, 1 जुलै: लहान मुलं भलतीच करामती असतात, ते कधी काय उचापती करतील याचा नेम नसतो. एखादी गोष्ट करू नको म्हटलं की ती गोष्ट हे पहिले करणार आणि मग आपण हे करून चुकलोय हे लक्षात आल्यावर मोठंमोठ्यानं ओरडणार.. एखादी रंगीबेरंगी वस्तू दिसली की लहान मुलं प्रथम तोंडात टाकून ओळखण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी त्यांचे सेन्सर त्यांची जीभ आणि बोटे आहेत, म्हणून जन्मानंतर, तीन वर्षांचा मुलगा त्याच्या तोंडात जे काही पकडू शकतो ते पकडतो. हे तसं सामान्य आहे, परंतु कधी कधी मुले तोंडात नाणी (Coins) आणि प्लॅस्टिक अशा गोष्टी टाकतात आणि मग त्यांची आणि पालकांची तारांबळ उडते. लहान मुलांची ही चूक त्यांच्या जीवावर बेतू शकते. एखाद्या लहान मुलानं नाणं गिळल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल, परंतु त्यानं नाणं गिळल्यावर नेमकं काय करावं (Tips to Save if child Swallows a Coin), हे आज आपण जाणून घेणार आहोत. नाणी गिळणे धोकादायक का आहे? मुलाच्या गळ्यात अडकलेले नाणे वेळीच काढले नाही तर मुलाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. कारण बहुतेक प्रकरणांमध्ये ही नाणी मुलांच्या फूड पाईपमध्ये अडकतात जी काही काळ थांबू शकतात परंतु जर हे नाणे मुलांच्या श्वसनमार्गामध्ये अडकले तर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पालकांनी धीर धरून गिळलेली वस्तू बाहेर काढण्यासाठी या टिप्स वापरून पहा. हेही वाचा- अचानक हात-पाय दुखणे, सूज येणं म्हणजे Water retention असू शकतं; इतरही आहेत अनेक कारणं मुलाच्या गळ्यात अडकलेले नाणे काढण्यासाठी टिप्स (How to remove if child Swallows a Coin)-