JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / उरलेले साबणाचे तुकडे वापरून घरच्या-घरी असा बनवा हँडवॉश; सॅनिटायझरवर फुकटचा खर्च करायलाच नको

उरलेले साबणाचे तुकडे वापरून घरच्या-घरी असा बनवा हँडवॉश; सॅनिटायझरवर फुकटचा खर्च करायलाच नको

Homemade Hand Wash: घरात आपण फक्त उरलेल्या साबणांच्या तुकड्यांनी आवडीच्या सुगंधासहित होममेड हँडवॉश (Homemade Hand Wash) तयार करू शकता. अशा प्रकारे हँडवॉश बनवणं खूप सोपं आहे, तसेच यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

जाहिरात

4- कोरोनाच्या काळात हँड सॅनिटायझर प्रत्येक घरात आहे. हे चांदीच्या पॉलिशिंगसाठी देखील वापरलं जाऊ शकतं. यासाठी एका भांड्यात थोडं सॅनिटायझर घ्या. त्यात चांदी घाला. अर्ध्या तासानंतर घासून पुन्हा सॅनिटायझरमध्ये बुडवा. काही वेळानं कोमट पाण्यानं चोळून धुवा. चांदी चमकेल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 मार्च : कोरोना महामारीनंतर (Corona Virus) बहुतेक लोकांच्या दिनचर्येत खूप बदल झाला आहे. मास्क घालणं, सुरक्षित अंतर राखणं, हात स्वच्छ धुणं काळाची गरज बनली आहे. हात धुण्यासाठी बाजारात आता सॅनिटायझरचा सुळसुळाट आहे. त्यामध्ये विविध प्रकार आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की घरात आपण फक्त उरलेल्या साबणांच्या तुकड्यांनी आवडीच्या सुगंधासहित होममेड हँडवॉश (Homemade Hand Wash) तयार करू शकता. अशा प्रकारे हँडवॉश बनवणं खूप सोपं आहे, तसेच यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. आज आपण घरच्या-घरी सॅनिटायझर बनवण्याचे उपाय जाणून घेणार (Homemade Hand Wash tips) आहोत. उरलेला साबण वापरा अनेकजण साबण लहान झाल्यानंतर किंवा त्याचे उरलेले तुकडे फेकून देतात. हे साबण तुम्ही हँडवॉश बनवण्यासाठी वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम साबणाचे उरलेले सर्व तुकडे खवणीच्या मदतीने किंवा कशानेतरी बारीक करून घ्या. हे वाचा -  मुलांना लहानपणीच शिकवा या गोष्टी; सर्वजण त्यांचेच नव्हे तर तुमचेही करतील कौतुक पाण्यात साबण उकळवा आता गॅसवर स्वच्छ पाणी किंवा फिल्टर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर या पाण्यात बारीक केलेले साबणाचे तुकडे टाका आणि फेस निघेपर्यंत उकळा. ग्लिसरीन आणि गुलाबपाणी घाला हँडवॉश अधिक प्रभावी होण्यासाठी या पाण्यात ग्लिसरीन आणि गुलाबजल घालण्यास विसरू नका. त्याच बरोबर हे पाणी घट्ट होईपर्यंत थोडा वेळ ढवळत राहा. हे वाचा -  रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी का बरं वाढते? मधुमेहींनी अशी घ्यावी काळजी एसेंशियल ऑयल मिसळा हँडवॉश घट्ट व्हायला लागल्यावर गॅस बंद करा आणि तुम्हाला हवे असल्यास या हँडवॉशमध्ये तुमच्या आवडीचे तेल घाला. कारण सुगंधाशिवाय हात धुणं अपूर्ण वाटतं. त्यामुळे या हँडवॉशमध्ये तुम्ही पेपरमिंट तेल, लॅव्हेंडर तेल किंवा कोणतेही सामान्य तेल वापरू शकता. ते थंड झाल्यावर हात धुण्यासाठी कुपीमध्ये ठेवा आणि नियमित वापरा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या