JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घरात सारखी होतात कोळ्यांची जाळी? हे जालीम उपाय करून बघा, परत नाहीत होणार

घरात सारखी होतात कोळ्यांची जाळी? हे जालीम उपाय करून बघा, परत नाहीत होणार

घरातील कोळ्याची जाळी काढण्याच्या काही टिप्स आणि युक्त्या जाणून घेऊयात. ज्याच्या मदतीने तुम्ही घरातील कोळ्याची जाळी लगेच स्वच्छ करू शकता आणि दीर्घकाळ कोळी घरात येणार (Tips to remove Spider Web) नाहीत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 मे : प्रत्येक व्यक्ती आपल्या घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देते. नियमित साफसफाई करूनही घरात इकडे तिकडे कोपऱ्यांमध्ये कोळ्यांची जाळी दिसतात. कोळ्यांची जाळी होणं खराब तर दिसतंच आणि स्वच्छ करण्याची भीती वाटते. विषारी कोळी असेल त्यामुळे आपल्या त्वचेला इन्फेक्शनही होऊ शकते. कोळ्याची जाळी साफ केल्यानंतर काही दिवसात पुन्हा दिसतात. घराच्या कोपऱ्यात किंवा अशा ठिकाणी जाळ्या होतात जिथे सहज आणि नियमितपणे साफसफाई करणे शक्य नाही. ही समस्या अनेकांच्या घरामध्ये होते. घरातील कोळ्याची जाळी काढण्याच्या काही टिप्स आणि युक्त्या (Tips and Tricks) जाणून घेऊयात. ज्याच्या मदतीने तुम्ही घरातील कोळ्याची जाळी लगेच स्वच्छ करू शकता आणि दीर्घकाळ कोळी घरात येणार (Tips to remove Spider Web) नाहीत. कोळ्याची जाळी काढण्याचे सोपे उपाय - ब्लीच वापरा - घरातील कोणत्याही प्रकारचे कीटक काढून टाकण्यासाठी तुम्ही ब्लीचचा वापर करू शकता. ब्लीचचा तिखट वास कोळी तसेच त्यांची अंडी नष्ट करतो. त्याचा वास खूप तिखट असतो. यासाठी प्रथम हात आणि चेहरा झाकून घ्या. यानंतर 1 कप पाण्यात 1 कप ब्लीच मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. आता जाळे असलेल्या ठिकाणी फवारणी करा. काही वेळ राहिल्यानंतर झाडूच्या मदतीने ती जागा स्वच्छ करा. लसूण वापरा - लसणाचा वासही खूप तिखट असतो. फर्निचरमधील जाळी साफ करण्यासाठी, तेथे लसणाच्या सोललेल्या कळ्या ठेवू शकता. तिखट वासामुळे कोळी जाळे बनवू शकत नाहीत. भिंतीवरील जाळे स्वच्छ करण्यासाठी लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्या. पाण्यात घालून स्प्रे बाटलीद्वारे फवारा आणि स्पायडर सतत येत असलेल्या भागांवर स्प्रे करा. यामुळे कोळी आणि इतर कीटकांचाही प्रतिबंध होईल. हे वाचा -  तरुण वयातील हा त्रास उतारवयात अनेक अडचणी आणू शकतो; आत्तापासूनच घ्या काळजी लिंबू फ्लेवर्ड क्लिनर वापरा - घरातील किडे आणि कीटकांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता. साफसफाईसाठी तुम्ही जो क्लिनर घ्याल तो लिंबाच्या चवीचा असावा. लिंबाच्या तिखट आणि आंबट वासामुळे किडे, कीटक घरातून पळून जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या