नवी दिल्ली, 12 एप्रिल : आजकालच्या फॅशनच्या दुनियेत स्मार्ट दिसणंही महत्त्वाचं आहे. स्टाइल म्हटलं की आपल्या जीन्स पँटचा (jeans) रोलही वरचढ असतो. अलिकडे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, महिलाही स्मार्ट लूकसाठी जीन्स घालणे पसंत करतात. परंतु, सर्व प्रकारच्या जीन्स सर्वांनाच शोभतील असे नाही. यासाठी जीन्स खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही स्वतःसाठी परफेक्ट जीन्स निवडू (Tips for buying jeans pants) शकता. अनेकदा काहीजण सांगतात की, जीन्स मला चांगली दिसत नाही, सूट होत नाही. मात्र, असं होण्यात जीन्सचा दोष नसतो खरं तर, अशा लोकांनी त्यांच्या पर्सनॅलिटीनुसार जीन्स घेतलेली नसते. त्यामुळे जीन्स त्यांना शोभत नाही. यासाठी जीन्स खरेदीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स समजून घ्या. बॉडी शेप ध्यानात घ्या - जीन्स खरेदी करताना आपला बॉडी शेप कसा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जर तुमची उंची चांगली असेल आणि तुमची तब्येत बारीक असेल, तर स्कीनी आणि स्ट्रेट लेग जीन्स तुम्हाला छान दिसतील. पीअर शेप बॉडीसाठी कर्व्ही फिट जीन्स घेतलेली चांगली. तसेच, जर तुम्ही जाड असाल तर स्वतःसाठी हाय राइज जीन्स खरेदी करा. यामुळे तुमची कंबर पातळ दिसेल. फॅशन महत्त्वाची - जीन्स खरेदी करताना फॅशनचा विचार नक्की करा. यासाठी नेहमी फॅशन ट्रेंडमध्ये असणारी हाय राइज जीन्स किंवा स्ट्रेट लेग जीन्स खरेदी करण्याचा प्रयत्न करा. कारण, बूटलेग जीन्स कधीकधी आऊट ऑफ फॅशन होतात. फॅब्रिक क्वाविटी बघा - जीन्सचा आकार, आकार आणि रंगासोबतच फॅब्रिककडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी फक्त सॉफ्ट टच असलेली स्ट्रेचेबल जीन्स खरेदी करा. अशा फॅब्रिकसह जीन्स बर्याच काळासाठी खराब होत नाहीत. तसेच ते खूप आरामदायक देखील आहे. हे वाचा - उन्हाळ्यात सर्वांनाच नको-नकोसा असतो घाम; पण, शरीरासाठी इतकं महत्त्वाचं करतो काम कलर परफेक्ट पाहिजे - तुम्ही जीन्स खरेदी करताना रंगाबाबत संभ्रमात असाल तर सरळ पारंपारिक निळा किंवा काळ्या डेनिमची घेऊन टाका. हे दोन असे रंग आहेत जे प्रत्येकाला चांगले दिसतात. याशिवाय तुम्ही कॅज्युअल आउटफिट्सपासून पार्टी वेअरपर्यंत ब्लू डेनिम जीन्स ट्राय करू शकता. काळ्या जीन्स रात्रीच्या पार्टीमध्ये खूप क्लासिक लुक देतात. हे वाचा - प्रयोगशाळेत शुक्राणू पेशी तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश! मानवासाठी ठरणार वरदान फिटिंग बिघडली की संपलं - जीन्स खरेदी करताना फिटिंग सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कलर-शेप या गोष्टी आहेतच पण ज्या जीन्समध्ये तुम्हाला अधिक कंपर्टेबल वाटतं, ती घ्या. चुकीच्या कंपर्टची चुकून खरेदी झालीच असेल तर अशी जीन्स फिटिंग करून घ्या. कारण तुमचा कॉन्फिडन्स लूकच तुमच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत असतो. (सूचना : येथे दिलेली माहिती जीन्स संदर्भातील सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)