JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बापरे! तब्बल 19 वर्षांनंतर केस कापायला गेली 'ही' टिकटॉक स्टार; केसांची लांबी बघून व्हाल थक्क

बापरे! तब्बल 19 वर्षांनंतर केस कापायला गेली 'ही' टिकटॉक स्टार; केसांची लांबी बघून व्हाल थक्क

अमेरिकेतली 26 वर्षीय वेनेसा आता तिच्या केसांमुळे टिकटॉक स्टार (Tiktok Star) बनली आहे. वयाच्या 7 व्या वर्षी वेनेसाने आपले केस कापले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 एप्रिल: लांब, घनदाट आणि सुंदर केस (Long Hair) प्रत्येक मुलीला हवे असतात. केसांमुळे मुलींच्या सौंदर्यात विलक्षण वाढ होते. केसांची वाढ व्हावी, ते हेल्दी आणि सुंदर राहावेत यासाठी अनेक उपाय केले जातात. दैनंदित आयुष्यात केसांची निगा राखण्यासाठी आवर्जून विशेष वेळ दिला जातो. अशातच एखाद्या मुलीचे केस सामान्य लांबीपेक्षा जास्त लांबीचे असतील तर त्या केसांकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं. अशीच एक घटना अमेरिकेत युटा येथे राहणाऱ्या एका मुलीसोबत घडली. या मुलीच्या लांब केसांमुळे ती आता टिकटॉक स्टार बनली आहे. याबाबतचं सविस्तर वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. अमेरिकेतली 26 वर्षीय वेनेसा आता तिच्या केसांमुळे टिकटॉक स्टार (Tiktok Star) बनली आहे. वयाच्या 7 व्या वर्षी वेनेसाने आपले केस कापले होते. तेव्हा तिला तिचा तो लूक अजिबात आवडला नव्हता. त्यानंतर तिने ठरवलं, की आता केस कापायचे नाहीत. यानंतर तिचे केस वाढत गेले आणि 4 फूट लांब झाले. जितकी तिच्या केसांची लांबी वाढत होती, तितके तिचे फॉलोअर्स वाढत गेले; मात्र यानंतर तिने तिचे केस पुन्हा कापले आणि चिन लेंग्थ बॉब हेअरकट केला. वेनेसाने तिचे एवढे लांब केस कापण्यामागचं कारणदेखील सांगितलं आहे. खरं की काय? आता शुद्ध शाकाहारी व्यक्तीही खाऊ शकतील चिकन; Vegan Chicken Wings म्हणजे नक्की आहे तरी काय? वाचा एवढे फॉलोअर्स (Followers) वाढल्यानंतरदेखील आपण लांब केस का कापले यामागचं कारण वेनेसाने उघड केलं. न्यूज डॉग मीडियाशी बोलताना वेनेसा म्हणाली, ‘मला माझे लांब केस प्रचंड प्रिय आहेत आणि मला हे पाहायचं होतं, की माझे केस किती वाढू शकतात. त्यामुळे केस वाढवले आणि वाढल्यानंतर ते माझ्या गुडघ्यांच्या खालपर्यंत दिसू लागले. मला कधीच वाटलं नव्हतं, की माझे केस एवढे वाढतील.’ वेनेसाने पुढे सांगितलं, ‘माझ्या लांब केसांमुळे लोक मला नोटीस करू लागले, माझं कौतुक करू लागलं. माझे लांब केस जणू माझी ओळखच बनले होते. स्वाभाविकच कधी कधी आपल्याला कौतुक ऐकायला आवडतं; पण हे वाढतच गेलं. त्यानंतर मात्र मी काहीशी अस्वस्थ झाले. माझ्या केसांबरोबरच लोकांनी माझ्या इतर गुणांचंही कौतुक करावं अशी माझी इच्छा होती.’ वेनेसा पुढे म्हणाली, ‘खूप काळ आत्मचिंतन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की माझ्या लांब केसांमुळे माझ्या आयुष्यात काही अडचणी येत आहेत. वयाच्या 7व्या वर्षी मी जशी होते त्यापेक्षा आता मी वेगळी बनले आहे. एक वेगळीच व्यक्ती बनली आहे. मला काही तरी वेगळं साध्य करायचं होतं. केसांमुळे बनलेली माझी ओळख मला बदलायची होती.’ Mango for health: गोड-मधुर चवीचा आंबा खाण्याचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील

यानंतर वेनेसा एका हेअरड्रेसरकडे गेली आणि तिने आपले केस कापून घेतले. आपले कापलेले केस तिने नंतर आपल्या फॉलोअर्सनादेखील दाखवले. तिला वाटलं होतं, की केस कापल्यानंतर तिचे फॉलोअर्स कमी होतील. काही युझर्सनी तिला यानंतर ट्रोल केले; मात्र अनेक जणांनी तिच्या या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं. वेनेसाने आता इतर मुलींना याबाबत इन्स्पायर करायचं ठरवलं आहे. त्यामुळे इतर मुलीही आपल्या आयुष्यात आपल्याला हवे तसे बदल करण्यासाठी प्रवृत्त होतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या