JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care for Men: पुरुषांची त्वचा असते रफ, त्याची विशेष काळजी घेण्यासाठी फॉलो करा या Tips

Skin Care for Men: पुरुषांची त्वचा असते रफ, त्याची विशेष काळजी घेण्यासाठी फॉलो करा या Tips

पुरुषांनी काही स्किनकेअर टिप्स (Skin Care Tips) फॉलो केल्या तर त्यांचा चेहरा आकर्षक आणि उठावदार होण्यास मदत होईल. जाणून घेऊ, पुरुषांनी स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 मार्च : महिला त्यांच्या त्वचेविषयी जागरूक असतात. परंतु, पुरुषांनीही त्यांच्या त्वचेची पुरेशी काळजी (Skin Care for Men) घेतली पाहिजे. महिला आणि पुरुषांची त्वचा वेगळी असते. त्यामुळं दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या त्वचेची काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा त्वचेची काळजी (Skin Care) न घेतल्यानं पुरूषांना त्वचेवर डाग, मुरुमं, ब्लॅक हेड्स, सुरकुत्या अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. पुरुषांनी काही स्किनकेअर टिप्स (Skin Care Tips) फॉलो केल्या तर त्यांचा चेहरा आकर्षक आणि उठावदार होण्यास मदत होईल. जाणून घेऊ, पुरुषांनी स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी. क्लींजिंग (Cleansing) क्लींजिंग हा स्किनकेअर रूटीनचा (Skincare routine) सर्वात महत्वाचा भाग आहे. दिवसभरानंतर त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत होते. तुमच्या त्वचेला खूप स्वच्छतेची गरज आहे. तुम्ही तुमची त्वचा आठवड्यातून एकदा चांगल्या स्क्रबने एक्सफोलिएट करावी. दाढीची काळजी (Shaving tips) पुरुषांची त्वचा आणि महिलांची त्वचा यातील मुख्य फरक म्हणजे चेहऱ्यावरील केस. पुरुषांना चेहऱ्यावरील केसांची काळजी घ्यावी लागते. त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यामधला हा एक महत्त्वाचा भाग आहे. शेव्हिंग करण्यापूर्वी शेव्हिंग जेल वापरा. हे तुमच्या चेहऱ्यावरील केसांना साबणापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे मऊ करतं. तुमच्या त्वचेला थोडा ओलावा देण्यासाठी आफ्टर शेव्ह क्रीम वापरा. अल्कोहोल-बेस्ड आफ्टरशेव्ह वापरू नये. कारण याच्यामुळं रेझर बर्नची स्थिती आणखी वाईट होते. हे वाचा -  प्रत्येक वेळी पाणी पिताना बसणं गरजेचं आहे का? योग्य पद्धत अनेकांना माहीत नाही सनस्क्रीन त्वचेवर सनस्क्रीन वापरणं आवश्यक आहे. सूर्याच्या प्रखर आणि हानिकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरणं चांगलं ठरेल. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहरा आणि मानेवर सनस्क्रीन नक्की लावा. हे वाचा -  तुमच्या मुलाला Diabetes होऊ द्यायचा नसेल तर या गोष्टींची वेळीच खबरदारी घ्या स्वतःच्या त्वचेनुसार स्किनकेअर प्रोडक्ट वापरा पुरुष त्यांच्या चेहऱ्यावर वापरत असलेल्या उत्पादनांविषयी फारशी काळजी घेत नाहीत. यामुळं त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मुरुम आणि लालसरपणा किंवा पुरळ यासारख्या त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी आपल्या त्वचेनुसार सौंदर्य उत्पादनं निवडा. या टिप्स त्वचा निरोगी बनवण्यात मदत करतील. याशिवाय, निरोगी त्वचेसाठी सकस आहार घेणंही महत्त्वाचं आहे. याच्यामुळं त्वचेला खोलवर पोषण मिळतं. याव्यतिरिक्त, तजेलदार आणि चमकदार त्वचेसाठी तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती फेस मास्क देखील वापरू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या