हळद त्वचेसाठी आरोग्यदायी - स्टाइलक्रेझमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हळद हा सर्वाधिक वापरला जाणारा मसाला आहे. यामध्ये असलेल्या क्युरक्यूमिन या कंपाऊंडमध्ये प्रतिजैविक, अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि अँटीनोप्लास्टिक गुणधर्म आहेत. सोरायसिस, त्वचेचा कर्करोग, हायपरपिग्मेंटेशन, त्वचा संक्रमण आणि वृद्धत्वाच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी हळदीचे सेवन करा किंवा फेस पॅक म्हणून वापरा.
मुंबई, 27 मे : हळदी (turmeric) औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. भाजीत हळद घातल्याने तिची चव तर वाढतेच पण आयुर्वेदिक औषध म्हणूनही हळदीचा वापर करता येतो. बरेच लोक विशेषत: स्त्रिया त्वचेला चमक आणण्यासाठी हळदीचा वापर करतात. असे करण्यात काहीही नुकसान होत नाही. परंतु हळद लावताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, त्याविषयी जाणून (turmeric side effects) घेऊया. साबणाने किंवा फेसवॉशने शरीर धुवू नका - झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, जर तुम्ही त्वचेवर हळद लावत असाल तर काही वेळाने ती साध्या पाण्याने धुवावी लागेल. पण, कोरडी हळद धुण्यासाठी अनेकजण साबण किंवा फेसवॉशचा वापर करू लागतात. तुमच्याकडूनही अशी चूक होत असेल तर आजच थांबवा. साबणाने धुतल्यावर हळदीचा प्रभाव निघून जातो. त्यामुळे हळद लावल्याचा कोणताही फायदा मिळत नाही. मिश्रणाचा प्रभाव पहा - त्वचेवर लावण्यासाठी तुम्ही हळदीमध्ये आणखी काही पदार्थ मिक्स करत असाल तर आधी त्याचा परिणाम पहा. शरीरावर कुठेही त्या मिश्रणाची ऍलर्जी वाटत असेल तर लगेच ती जागा स्वच्छ पाण्याने धुवा. जास्ती विलंब झाल्यास शरीराच्या त्या भागात खाज सुटणे आणि चट्टे येऊ शकतात. यासोबतच तुम्हाला आरोग्याशी संबंधित इतर समस्या देखील होऊ शकतात. जास्त वेळ हळद लावणे टाळा - अनेक महिलांना त्वचा उजळण्यासाठी हळद जास्त वेळ लावायला आवडते. हळद लावण्याची ही चुकीची पद्धत आहे. हळदीचा प्रभाव उष्ण असतो हे समजून घेतले पाहिजे. त्वचेवर हळद बराच वेळ लावल्यानंतर तेथे चट्टे तयार होऊ शकतात. त्यामुळे काही वेळाने हळद सुकताच ती स्वच्छ पाण्याने धुवावी. असे केल्याने तुम्हाला अधिक फायदा होईल. हे वाचा - तरुण वयातील हा त्रास उतारवयात अनेक अडचणी आणू शकतो; आत्तापासूनच घ्या काळजी उन्हाळ्यात कमी वापरा - सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात हळद पेस्टच्या स्वरूपात शरीरावर कमी प्रमाणात लावा. लावायचे असल्यास त्यात दही किंवा थोडे बेसन घालावे. असे केल्याने, त्याच्या गरम प्रभावामध्ये काही प्रमाणात शीतलता येते, उन्हाळ्यात हळद लावल्याचा त्रास त्यामुळे होणार नाही. हे मिश्रण काही काळ शरीरावर लावून तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता. हे वाचा - उन्हाळ्यात दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी या 5 गोष्टी आहेत महत्त्वाच्या (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)