JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हे ड्रायफ्रूट्स Heart Attack पासून करतील बचाव, मात्र अधिक प्रमाणात खाणं धोकादायक!

हे ड्रायफ्रूट्स Heart Attack पासून करतील बचाव, मात्र अधिक प्रमाणात खाणं धोकादायक!

हे आजार टाळण्यासाठी किंवा नियंत्रणासाठी आहार हा महत्त्वाचा घटक असतो. योग्य आहारामुळे (Diet) डायबेटीससोबतच हृदयविकारही नियंत्रणात राहू शकतो.

जाहिरात

त्यामुळे शरीराच्या इतर भागात जाणाऱ्या रक्तालाही अडथळा निर्माण होतो आणि घातक स्थिती बनते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जून : हृदयविकार (Heart Disease) आणि डायबेटीस (Diabetes) हे गंभीर स्वरूपाचे आजार. हे आजार होण्यामागे बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा व व्यायामाचा अभाव आणि ताण-तणाव ही कारणं सांगितली जातात. हे आजार टाळण्यासाठी किंवा नियंत्रणासाठी आहार हा महत्त्वाचा घटक असतो. योग्य आहारामुळे (Diet) डायबेटीससोबतच हृदयविकारही नियंत्रणात राहू शकतो. आहारात तेलकट पदार्थांचा जास्त प्रमाणात समावेश असल्यास हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अ‍ॅटॅकचा (Heart Attack) धोका वाढतो. त्यामुळे संतुलित आणि पोषक आहार महत्त्वाचा ठरतो. रोजच्या आहारात ड्रायफ्रूट्सचा (Dry Fruits) समावेश असेल, तर हृदयविकाराची जोखीम कमी होते. ड्रायफ्रूट्सपैकी अक्रोड (Walnut) हे हृदयविकारासह डायबेटीसच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरू शकतात; पण अक्रोडचं सेवन मर्यादित स्वरूपाचं असावं, अन्यथा त्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. याविषयी माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. हृदयविकार, डायबेटीस असलेल्या रुग्णांचा आहार आरोग्यपूर्ण असावा, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. या रुग्णांसाठी ड्रायफ्रूट्स उपयुक्त ठरू शकतात. त्यापैकी अक्रोड हृदयविकाराच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. अक्रोडमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. कोणताही पदार्थ प्रमाणात खाल्ला, तर त्यामुळे शरीराला अपाय होत नाही. अक्रोडच्या बाबतीतदेखील हेच सूत्र लागू होतं. अक्रोडमध्ये पोषक तत्त्वं मुबलक असली, तरी त्याचं सेवन मर्यादित प्रमाणात हवं. अशक्त व्यक्तींनी रोज अक्रोडचे 10 ते 12 तुकडे खावेत. तंदुरुस्त व्यक्ती 6 ते 7 तुकडे खाऊ शकतात. यापेक्षा जास्त अक्रोड खाणं अपायकारक ठरू शकतं. हृदयविकार असलेल्या रुग्णांनी अक्रोडचे 2 ते 4 तुकडे खावेत. कारण जास्त प्रमाणात अक्रोड खाल्ले, तर कॅलरीज (Calories) वाढतात आणि फायदा होण्याऐवजी नुकसान होतं. अक्रोडमध्ये स्टेरॉल्स आणि प्लांट बेस्ड ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड (Omega -3 Fatty Acid) मुबलक असतं. तसंच, लिनोलेनिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. हे घटक कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. शाकाहारी व्यक्तींनी अक्रोड खाणं अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड्सची रोजची गरज पूर्ण होते. रक्तवाहिन्यांमधलं बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर ब्लड प्रेशर (Blood Pressure) वाढून हृदयाशी संबंधित आजार वाढतात. तसंच हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी अक्रोड खाणं फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये भरपूर पोषक तत्त्वं असतात. फायबर, व्हिटॅमिन ई, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्सचा यात समावेश असतो. अक्रोड खाल्ल्यामुळे डायबेटीस टाइप-2चं (Diabetes Type-2) योग्य व्यवस्थापन शक्य होतं. त्यामुळे योग्य प्रमाणात अक्रोड खाल्ल्यास हृदयविकार आणि डायबेटीस नियंत्रणात राहण्यासाठी फायदा होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या