JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मेहंदी लावण्यापूर्वी त्यात मिसळा या 4 गोष्टी, पांढरे होणार नाहीत केस!

मेहंदी लावण्यापूर्वी त्यात मिसळा या 4 गोष्टी, पांढरे होणार नाहीत केस!

केसांना रंग देण्यासाठी लोक मेहंदी, हेअर कलर किंवा डायचा वापर करतात. पण या सर्वाचा परिणाम फार कमी काळासाठी राहतो.

जाहिरात

काही लोक गोरा रंग मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. अजूनही अनेकांना असं वाटतं की, ज्या व्यक्ती गोऱ्या असतात त्याच सुंदर दिसतात. मात्र असं काही नाही. सगळ्या गोष्टी माहीत असूनही आजही अनेकजण गोऱ्या रंगासाठी पार्लरमध्ये हजारो रुपये देऊन वेगवेगळे उपाय करताना दिसतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गेल्या काही काळापासून केसांना रंग देणं हा एक ट्रेण्ड झाला आहे. काही लोक पांढरे केस लपवण्यासाठी केसांना रंग देतात तर काही फॅशन म्हणून केस रंगवतात. हायलाइट करणं हाही सध्याचा एक ट्रेण्ड आहे. त्यातही केसांना रंग देण्यासाठी लोक मेहंदी, हेअर कलर किंवा डायचा वापर करतात. पण या सर्वाचा परिणाम फार कमी काळासाठी राहतो. काही दिवसांनी किंवा महिन्यांनी रंग उतरायला लागतो. अशात आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमच्या केसांचा रंग दीर्घकाळ टिकून राहील. मेहंदी भिजवण्यासाठी लागणारं पाणी तयार करण्याची विशेष पद्धत- पाणी- 1 ग्लास मेथी धणे पावडर- 1 चमचा कॉफी पावडर- 1 चमचा लवंग पावडर- 1 चमचा प्रक्रिया- एक ग्लास पाण्यात मेथी धणे आणि कॉफी पावडर टाकून 2 ते 3 मिनिटांसाठी उकळा. यानंतर पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. मेथीचे दाणे केसांना नैसर्गिकरित्या मजबूत आणि काळे करू शकता. तसेच कॉफी पावडर मेहंदीच्या रंगाला आधिक गडद करतात. तसेच लवंग पावडरमुळे केसांची मुळं घट्ट व्हायला मदत मिळते. मेहंदी तया करण्याची पद्धत- साहित्य- मेहंदी- 100 ग्रॅम हिबिस्कस पावडर (Hibiscus)- 1 टेबलस्पून आवळा पावडर-  1 टेबलस्पून शिकाकाई पावडर-  1 टेबलस्पून कॉफी पावडर-  1 टेबलस्पून प्रक्रिया- लोखंडी कढईत मेहंदी हिबिस्कस पावडर, आवळा पावडर, शिकाकाई पावडर आणि कॉफी पावडर एकत्र करा. यासाठी लोखंडी कढाईचाच वापर करणं गरजेचं आहे. यामुळे मेहंदी चांगल्या पद्धतीने ऑक्सीडाइज्ड होईल. आता यात तयार केलेलं पाणी घाला आणि रात्रभर किंवा सात ते आठ तास मेहंदी भिजवत ठेवा. टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. या उपायांनी आता गळणार नाहीत तुमचे केस, एकदा वाचाच! Diwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर… Dhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट या सोप्या टिप्सने तुम्हीही बोलू शकता अस्खलित इंग्रजी! या औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या