चित्रातील काटेरी निवडुंग शोधा अन् स्वतःला सिद्ध करा
मुंबई, 18 नोव्हेंबर : सध्या प्रसिद्ध झालेल्या ऑप्टिकल इल्युजन प्रकारातील फोटो किंवा चित्रातून एखादी दडलेली वस्तू शोधून काढणं अवघड असतं. यात तुमच्या मानसिकतेची आणि निरीक्षणशक्तीची कसोटी लागते. चित्रात लपलेल्या वस्तूंना शोधायला केवळ काही सेकंदांचाच अवधी मिळतो. त्यामुळे हे आव्हान स्वीकारणार्या लोकांना आपल्या डोक्याला चांगलीच चालना द्यावी लागते. यामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि नजरेचा चांगलाच कस लागतो. साधारणपणे, मेंदूला चालना देणारे खेळ खेळण्याचं आपण टाळतो. परंतु, ऑप्टिकल इल्युजनचे हे खेळ तुमच्या बुद्धीसाठी खुराकच ठरतात. दृष्टिभ्रमाच्या या चित्रात खेळण्याचं दुकान दिसत आहे. या दुकानात छान-छान खेळणी आणि काही सॉफ्ट टॉईजसुद्धा आहेत. या सगळ्यात एक काटेरी निवडुंग लपवलेलं आहे. अर्थात, इतक्या सहजपणे तुम्हाला ते दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला 7 सेकंदांचा वेळ दिला आहे. इतक्या कमी वेळात तुम्हाला तुमच्या हुशारीची आणि तीक्ष्ण निरीक्षणशक्तीची झलक दाखवायची आहे. या ऑप्टिकल इल्युजनच्या खेळात केवळ 2 टक्के मंडळीच यशस्वी झाली आहेत. खेळण्याच्या दुकानात लपवलंय एका काटेरी निवडुंग तुमच्यासमोर जे चित्र दिसतंय, हे खरं तर लहान मुलांसाठी बनवलं आहे. परंतु, लहान मुलांसोबत या चित्रातून निवडुंग शोधण्यात तुम्हालाही नक्कीच मजा येईल. हे चित्र एका खेळण्याच्या दुकानाचं आहे. यात विविध प्रकारची खेळणी आहेत. टेडी बेअर, बनी, कार, रोबो अशी सगळी खेळणी या दुकानात आहेत. ही खेळणी विकत घेण्यासाठी लहान मुलंही दुकानात दिसत आहेत. आता या खेळण्याच्या दुकानात काटेरी निवडुंग लपवलेलं आहे. ते शोधून काढण्याचंच आव्हान आहे. परंतु, हे शोधून काढण्यापूर्वी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदच आहेत हे लक्षात घ्या. वाचा - टेस्लाच्या ऑटोमॅटिक कारने उडवली सगळ्यांची झोप, धडकी भरवणारा Video व्हायरल रोबोच्या पाठीमागे दडवलं आहे निवडुंग तुम्हाला खरंच या खेळाच्या दुकानातून निवडुंग शोधायचं असेल, तर तुमची नजर घारीसारखी तीक्ष्ण असायला हवी. निवडुंग शोधून काढण्यासाठी तुम्हाला दुकानाचे नीट निरीक्षण करायला हवे. दुकानातील प्रत्येक रॅककडे बारकाईने पाहायला हवे. हे निवडुंग संपूर्ण दुकानात कुठल्याही खेळण्याच्या मागे लपलेलं असू शकतं. कदाचित, तुमच्यातील काहीजणांनी हे निश्चितपणे शोधलं असेलही. परंतु, तुम्ही जर शोधून-शोधून थकला असाल, तर हरकत नाही. वर दिलेल्या चित्रात आम्ही तुम्हाला निवडुंग नक्की कुठे आहे, त्याची जागा तुम्हाला आम्ही दाखवतोय. त्यानुसार हे निवडुंग रॅकमध्ये उजव्या बाजूस असलेल्या रोबोच्या पाठीमागे दिसेल. अर्थात, आता तुम्हाला ते नक्कीच सापडलं असणार.
ऑप्टिकल इल्युजन हा करमणुकीचा नवा पर्याय निर्माण झाला आहे. कोडी सोडवणं सगळ्यांना आवडतच असं नाही. परंतु, दृष्टिभ्रमाचे हे खेळ खूप व्हायरल होताना दिसतायत. तसंच अधिकाधिक लोकं सोशल मीडियावर या खेळाचा आनंद घेतानाही दिसत आहेत.