JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Seeds For Health: या फळं-भाज्यांच्या बिया कधीही फेकू नयेत; गंभीर आजारांवर आहेत गुणकारी

Seeds For Health: या फळं-भाज्यांच्या बिया कधीही फेकू नयेत; गंभीर आजारांवर आहेत गुणकारी

बियांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्याचा आपल्या आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. जाणून घेऊया अशा बियांविषयी ज्या कचराकुंडीत फेकण्याऐवजी त्यांचा उपयोग करणं (Benefits of eating seeds) फायदेशीर ठरतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 मार्च : फळं-भाज्यांचा खाण्यासाठी वापर केल्यानंतर त्यातील बिया (seeds) आपण कचऱ्यात फेकून देतो. खरंतर बियांमध्ये देखील अनेक पोषक घटक असतात याविषयी अनेकांना माहिती नसते. काही फळे आणि भाज्यांच्या बिया (Vegetables seeds) आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बियांमध्ये अतिशय पौष्टिक घटक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. बियांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्याचा आपल्या आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. जाणून घेऊया अशा बियांविषयी ज्या कचराकुंडीत फेकण्याऐवजी त्यांचा उपयोग करणं (Benefits of eating seeds) फायदेशीर ठरतं. भोपळ्याच्या बिया झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार,  बहुतेक लोक भोपळ्याच्या बिया काढून फेकून देतात, परंतु, या बिया आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यामध्ये चरबी आणि जीवनसत्त्वे खूप चांगल्या प्रमाणात असतात, असे सांगितले जाते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. भोपळ्याच्या बिया कच्च्या खाल्ल्या जाऊ शकतात, परंतु भाजलेल्या बिया आणखी चवदार लागतात. पपईच्या बियांचाही खूप उपयोग पपईच्या बियांचाही खूप उपयोग होतो. पपईच्या बिया अनेक रोगांवर उत्तम उपाय असल्याचे मानले जाते. या बियांमध्ये अनेक रोगांचा धोका आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस टाळण्याची क्षमता आहे. पपईच्या बियांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही पपईच्या बिया कच्च्या खाऊ शकता, पण ते खाताना थोडी काळजी घ्या, कारण त्यांना उग्र वास येतो. हे वाचा -  अंघोळ करताना होणाऱ्या या चुका टाळा; तुमच्या Natural beautyवर होईल असा परिणाम चिंचेच्या बिया हृदय विकारांसाठी याशिवाय चिंचेच्या बियाही आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, हे फार कमी लोकांना माहीत असेल. या बिया तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीच नव्हे तर तुमच्या दातांसाठीही फायदेशीर आहेत, असे सांगितले जाते. एवढेच नाही तर त्यामुळं इन्फेक्शन होण्याची शक्यताही कमी होते. हे वाचा -  या 5 डाळींमधून मिळतं मुबलक प्रोटीन; पिळदार बॉडी बनवण्यासाठी असा करा उपयोग अंबाडीच्या बिया अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ते केस गळणे कमी करतात आणि टाळू मजबूत करण्यास मदत करतात. त्यामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्तदेखील विपुल प्रमाणात आहेत. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या