JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरड्या खोकल्यापासून आराम देतील 6 घरगुती उपाय

कोरड्या खोकल्यापासून आराम देतील 6 घरगुती उपाय

सामान्य खोकला घरगुती उपचारांनी बरा होऊ शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाने जगातील सर्वच लोक दहशतीखाली आहेत. काहींना कोविड-19 आजारात सर्दी, खोकला आणि ताप येतो. कोविड-19 या आजाराचं पहिलं लक्षण आहे कोरडा खोकला आणि ताप. अशात जर सामान्य कोरडा खोकला आला तरी लोक कोरोनाच्या संक्रमणाच्या भीतीने घाबरतात. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांनी सांगितलं, कोरड्या खोकल्यात कफ होत नाही. त्याचे कारण थंडी, धूम्रपान, फुफ्फुसांचे आजार, कॅन्सर किंवा अस्थमा असू शकते. सामान्य खोकला घरगुती उपचारांनी बरा होऊ शकतो. जाणून घेऊया घरगुती उपचारांविषयी - अनंतमूळच्या पानांचे पाणी अनंतमूळ एक औषधी वनस्पती आहे. जी सर्वत्र आढळते. या वनस्पतीची चार-पाच पानं चांगली उकळून घ्यावी आणि ते पाणी गाळून प्यावं. ते प्यायल्यानंतर 15 ते 20 मिनिटानं उलटी होते. याने गळा आणि पोटात असलेले विषारी द्रव्ये, पित्त, कफ बाहेर पडतो. असं लागोपाठ दोन दिवस केल्यानं खोकला बरा होतो. याचे सेवन करताना एक काळजी घ्या की याचे सेवन दिवसातून एकदाच करायचे आहे, दोन-तीन वेळा केलं तर वारंवार उलट्या केल्याने शरीर कमजोर होईल. आले आणि मधाचे मिश्रण myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, कोरडा खोकला बरा होण्यासाठी घरातच उपलब्ध असलेले आले आणि मध हे एक उत्तम औषध आहे. आल्याचा रस काढायचा त्यात मध मिसळायचं आणि दिवसातून दोन -तीन वेळा ते मिश्रण चाटायचं. त्याने घशाला आराम मिळतो आणि खोकला जातो. जर या मिश्रणात थोडी काळी मिरी घातली तर लवकर फायदा होतो. हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेणं हळदीचे दूधदेखील खोकल्यात लाभदायक असतं. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटि व्हायरल गुण असतात, ते संसर्गापासून वाचवण्यात मदत करतात. रोज रात्री झोपताना हळदीचे दूध प्यायल्यानं संसर्गापासून वाचण्यास मदत होते आणि त्याने कोरडा खोकलाही दूर होतो. या हळदीच्या दुधात चार- पाच खारका घातल्या तर लवकर फायदा होतो. लसूणही खोकल्यावर उपयुक्त लसूण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात अँटिबॅक्टीरियल गुण असतात. लसणाच्या काही पाकळ्या तुपात तळून घ्याव्या आणि त्या गरम-गरम खाव्या त्याने गळ्याला शेक मिळतो आणि बरं वाटतं. कोरड्या खोकल्यासाठी लसूण रामबाण औषध मानलं जातं. हे घरगुती उपायपण आहेत फायदेशीर काळी मिरी, जायफळाची पूड आणि आणि मध एकत्र घेतलं तर लवकर फायदा होतो. हे दिवसातून तीन-चार वेळा घ्यायला हवं. हे घेतल्यानंतर गरम पाणी प्यावं. गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो. त्याने गळ्यातील दुखणं बरे होतं. दिवसातून दोनचार वेळा अश्या गुळण्या केल्याने लवकरच आराम मिळतो. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - कोरडा खोखला न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या