JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Online class मध्ये विद्यार्थ्याचा प्रताप; पाहून शिक्षकही झाले शॉक

Online class मध्ये विद्यार्थ्याचा प्रताप; पाहून शिक्षकही झाले शॉक

या मुलानं ऑनलाइन क्लासमध्ये जे काही केलं त्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

जाहिरात

मुलांचे डोळे नाजूक असतात. मुलाला डोळ्यांचा त्रास असेल तर, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसवर जास्त वेळ घालवणं त्याच्यासाठी खुपच हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे मुलांना थोड्याथोड्या वेळाने स्क्रिनवरून डोळे बाजूला घेण्याची सवय लावा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जानेवारी : माझ्या पोटात दुखतं आहे, मला बरं नाही वाटत आहे. असं सांगून शाळेला दांडी मारणं किंवा शाळेतून घरी येणं हे सर्व बहाणे तर आपल्याला माहितीच आहे. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत मुलांच्या ऑनलाइन शाळा (online school) सुरू आहेत. त्यामुळे अशी कारणं द्यायला वाव नाही. पण तरीही मुलं ती मुलं. ऑनलाइन क्लासमध्येही (online class) दांडी मारण्यासाठी मुलं काही ना काही ट्रिक शोधून काढतंच आहेत. अशाच एका विद्यार्थ्याचा प्रताप सध्या समोर येत आहे. ऑनलाइन क्लासमध्ये एका विद्यार्थ्यानं काय केलं याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या विद्यार्थ्याचा प्रताप पाहून त्याची शिक्षिकेलाही धक्का बसला.  ट्विटर युझर Chris Arnold नं ट्विट केलं आहे.  Chris Arnold  यांची बायको शिक्षिका आहे आणि ऑनलाइन क्लास घेताना एका विद्यार्थ्याबाबत तिला आलेला अनुभव त्यांनी शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

Chris Arnold यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, “माझी पत्नी शिक्षिका आहे आणि ती मुलांचे ऑनलाइन क्लास घेते आहेत. याच दरम्यान एका मुलानं जे काही केलं ते पाहून माझी पत्नी हैराण जाली. ऑनलाइन क्लासदरम्यान एका विद्यार्थ्यानं आपल्या झूम स्क्रिनवरील नाव बदलून  Reconnecting केलं. जेणेकरून शिक्षिका त्याला कोणता प्रश्न विचारू नये. जवळफास एक आठवडा त्या मुलाचं असंच सुरू होतं. सुरुवातीला माझ्या पत्नीला वाटलं की स्क्रिनमध्ये काही गडबड असेल पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा तिला धक्काच बसला” हे वाचा -  सुनेमुळे फळफळलं सासऱ्याचं नशीब; इतकी वर्षे शक्य झालं नाही ते तिनं क्षणात केलं ख्रिस यांनी हे ट्विट करतातच त्याचीच चर्चा सुरू आहे. यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे. सोशल मीडियावर या मुलाला जीनिअस म्हटलं आहे. शिवाट इतर युझर्सही आपल्या मुलांचा किंवा विद्यार्थ्यांचा असाच काही अनुभवही शेअर करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या