Smart wallet
नवी दिल्ली, 29 जुलै : इंटरनेट (Internet) आणि स्मार्टफोनमुळे (Smartphone) आपली अनेक कामं सोपी झाली आहेत. स्मार्टफोनमुळे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणं सहज-सुलभ झालं आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या मदतीनं तुम्ही शॉपिंग, बिलं भरणं आदी कामं ऑनलाइन करू शकता. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्याचं प्रमाण वाढलेलं असलं, तरी बहुतांश व्यक्तींची खिशात पाकीट (Wallet) ठेवण्याची सवय आजही कायम आहे. काही वेळा पाकीट चोरीला जाणं, हरवणं असे प्रकार घडतात. यामुळे आर्थिक नुकसान होतं; पण आता या गोष्टी संपुष्टात येणार आहेत. प्रगत तंत्रज्ञानामुळे वॉलेटचं स्वरूप बदललं आहे. आता असं एक अनोखं वॉलेट उपलब्ध होत आहे, ज्यात ब्लू-टूथ ट्रॅकर, अॅंटीलॉस्ट अलार्म अशी अनेक फीचर्स आहेत. असं खास स्मार्ट वॉलेट (Smart Wallet) उपलब्ध झालं आहे. `आज तक`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पैशांचं पाकीट चोरीला जाणं, हरवणं या गोष्टी अनेकदा घडतात; पण आता या गोष्टी टाळता येणार आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Tag8 या ब्रँडचं स्मार्ट वॉलेट उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे अन्य ब्रँड्सही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. या वॉलेटमध्ये अनेक फीचर्स आहेत. ही फीचर्स अत्यंत उपयुक्त ठरणारी आहेत. अॅमेझॉनवर (Amazon) या वॉलेटची किंमत 2199 रुपये आहे; मात्र या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर या वॉलेटची किंमत 2499 रुपये आहे. हेही वाचा - मुलांच्या या सवयींमुळे सार्वजनिक ठिकाणी तोंड लपवायची वेळ?, पालकांनी घ्यावी ही काळजी! या स्मार्ट वॉलेटमध्ये जीपीएस (GPS), ब्लू-टूथ ट्रॅकर (Bluetooth Tracker) आणि अॅंटी लॉस्ट अलार्म (Anti lost Alarm) ही फीचर्स आहेत. तुमचं वॉलेट हरवलं, तर तुम्ही जीपीएसद्वारे एका अॅपच्या मदतीनं त्याचं लोकेशन ट्रॅक करू शकता आणि वॉलेट परत मिळवू शकता. हे वॉलेट तुमच्या रेंजमधून बाहेर गेलं तर फोनवर सेपरेशन अलार्म वाजू लागेल. यात युझर्सना कम्युनिटी सर्चचा (Community Search) ऑप्शनही देण्यात आला आहे. स्मार्ट वॉलेटमधल्या इतर फीचर्समध्ये ब्लू-टूथ ट्रॅकर आणि अॅंटीलॉस्ट सिस्टिम आहे. यासाठी वॉलेटमध्ये एक बॅटरी देण्यात आली आहे; मात्र ही बॅटरी तुम्हाला रिप्लेस करता येणार नाही. ही बॅटरी सुमारे 36 महिने चालू शकते. ती चार्ज करण्यासाठी कोणताही ऑप्शन देण्यात आलेला नाही. प्रॉडक्टच्या तपशीलानुसार, या वॉलेटमधली ब्लू-टूथ रेंज 250 ft पर्यंत आहे. स्मार्ट वॉलेटमधली सर्व फीचर्स वापरण्याकरिता तुम्हाला DOLPHIN Tracker हे अॅप डाउनलोड करावं लागेल. हे अॅप आयओएस (iOS) आणि अँड्रॉइड (Android) या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. वैविध्यपूर्ण फीचर्स समावेश असलेलं हे स्मार्ट वॉलेट तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकतं.