JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Singer kk life could be save by CPR : काय आहे हा CPR जो वाचवू शकला असता Singer KK चा जीव?

Singer kk life could be save by CPR : काय आहे हा CPR जो वाचवू शकला असता Singer KK चा जीव?

पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार गायक केकेच्या हार्टमध्ये ब्लॉकेज असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याला वेळेत सीपीआर दिला असता तर त्याचा जीव वाचला असला, असं डॉक्टर म्हणाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जून : प्रसिद्ध गायक केके म्हणजे कृष्णकुमार कुन्नथचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Singer KK died due to heart attack). आज त्याच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार झाले (Singer KK funeral). त्यासोबतच त्याचा पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून त्याच्या मृत्यूबाबत मोठी माहिती समोर आली आहे (Singer kk postmortem report). या रिपोर्टनुसार जर त्याला वेळेत सीपीआर मिळाला असता तर त्याचा जीव वाचला असता अस खुलासा डॉक्टरांनी केला आहे. (Singer kk life save by CPR). प्राथमिक वैद्यकीय रिपोर्टनुसार हार्ट अटॅक हेच केकेच्या मृत्यूचं कारण आहे.  पीटीआय च्या वृत्तानुसार ज्या डॉक्टरांनी केकेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट केला त्यांनी केकेच्या हार्टमध्ये ब्लॉकेज असल्याचं सांगितलं. हृदयाच्या डाव्या बाजूच्या मुख्य रक्तवाहिनीत मोठा तर इतर रक्तवाहिन्यांमध्ये लहान ब्लॉकेज होते. कॉन्सर्टमधील अतिउत्साहामुळे त्याचा रक्तप्रवाह थांबवा आणि त्यामुळे हार्ट अटॅक आला. जर त्याला वेळेत सीपीआर दिला असता तर त्याचा जीव वाचला असता, असं डॉक्टरांनी सांगितलं. हा सीपीआर म्हणजे काय? तो कसा दिला जातो? आणि त्यामुळे जीव कसा वाचू शकतो? ही संपूर्ण माहिती सविस्तर पाहुया. काय आहे सीपीआर? कार्डियो पल्मनरी रेसॅसिटेशन (Cardiopulmonary Resuscitation) असा सीपीआरचा लाँगफॉर्म आहे. काही परिस्थितीत व्यक्तीचा श्वास कोंडला जातो. तिला सामान्यपणे श्वास घेता येत नाही. अशा स्थितीत त्या व्यक्तीला कृत्रिम ऑक्सिजनची (Artificial oxygen) अत्यंत आवश्यकता असते. मात्र, प्रत्येक व्यक्तीला वेळेवर वैद्यकीय मदत मिळेलच याची शाश्वती नसते. अशा वेळी सीपीआर फार उपयुक्त ठरतो. ज्यामुळे शरीरातील रक्तात आधीपासून उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा त्याच्या पूर्ण शरीराला केला जातो आणि व्यक्तीला काही काळ जिवंत ठेवायला मदत होते. सीपीआर कधी देण्यात येतो? एखाद्याला हार्ट अटॅक आला, श्वास कोंडल्यास, एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्याचा श्वास घेणे थांबते. त्यावेळी ही उपचार पद्धती उपयोगाची ठरते. त्याचबरोबर एखादी व्यक्तीला अचानक विजेचा धक्का बसल्यावर, अपघातामध्ये गंभीर दुखापत होऊन बेशुद्ध झाल्यावर, पोहताना कुणी बुडालं तर त्याच्या फुफ्फुसामध्ये गेलेले पाणी काढण्यासाठी, फुप्फुसामध्ये खूप धूर जमा झाल्यानं ती व्यक्ती बेशुद्ध पडली अथवा त्याला श्वास घेण्यास त्रास झाला तर सीपीआर देण्यात येतो. सीपीआर कसा दिला जातो? सीपीआर देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या औषधाची किंवा इंजेक्शन गरज भासत नाही. ज्या व्यक्तीचा श्वास गुदमरला आहे किंवा हृदयाची गती मंदावली आहे, ती पूर्ववत होऊपर्यंत छातीवर दाब दिला जातो. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सामान्य होण्यास मदत होते. याशिवाय सीपीआरमध्ये रुग्णाला तोंडानंही श्वास दिला जातो. सीपीआर देण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जिचा वापर करून अनेकांचा जीव वाचवता येऊ शकतो. काहीवेळा अपघातात तोंडाला जखम झाली तर तोंडातून श्वास घेता येत नाही, अशा परिस्थितीत नाकातूनही श्वास दिला जातो.  यामुळे त्या व्यक्ती किंवा रुग्णाच्या फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहचतो. यामुळे शरीरात अगोदरच असलेल्या ऑक्सिजनमिश्रित रक्ताला चालना मिळते. हे वाचा -  …त्या Golden hour मध्ये Singer KK वाचला असता; छोट्याशा चुकीमुळे गेला जीव? लहान मुलांसाठी आणि मोठ्या व्यक्तींसाठी सीपीआर उपचाराची पद्धत ही वेगळी आहे. मुल अगदी लहान असेल तर त्याला दोन बोटांच्या किंवा तोंडाच्या साह्याने हळू-हळू श्वास दिला जातो. यामुळे ते मुल लवकर शुद्धीवर येण्यास मदत होते. प्रौढ व्यक्तीला सीपीआर देण्याची पद्धत ही वेगळी आहे.  प्रौढ व्यक्तींना हे उपचार करण्यापूर्वी त्यांना समतल जमिनीवर झोपवले जाते. त्यानंतर त्याची छाती दाबली जाते. तसेच त्याचे डोके खाली राहील या पद्धतीने त्याची छाती जमिनीपासून वर उचलण्यात येते. त्यामुळे देखील त्याच्या  शरीरातील रक्तात आधीपासून उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा मिळतो. सीपीआरमुळे काय होतं? या प्रक्रियेचा शरीरावर काय परिणाम होतो हे आपण समजून घेऊया. जर एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास किंवा हृदयाचे ठोके बंद झाले असतील, तर पुरेशा ऑक्सिजनअभावी तिच्या शरीरातील पेशी मृत होऊ लागतात. या गोष्टीचा व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे काहीवेळा व्यक्तीचा मृत्युदेखील होतो. अशा परिस्थितीत सीपीआर दिल्यास जीव वाचू शकतो. सीपीआर देताना घेण्याची खबरदारी सीपीआर देण्यापूर्वी त्या व्यक्तीला श्वास घेता येईल या ठिकाणी झोपवले पाहिजे. तसेच त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडू नये. सीपीआर देणाऱ्या व्यक्तीला यामध्ये तज्ज्ञ असेल तरच हे उपचार द्यावेत, अन्यथा हे धोकादायक ठरु शकते. त्याचबरोबर सीपीआरचा उपयोग हा ती व्यक्ती काही काळ जीवंत राहण्यासाठी आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला लवकरात लवकर पुढील उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे. हे वाचा -  काय आहे CPR उपचार पद्धत? ज्यामुळे पल्स बंद झाल्यानंतरही फुटबॉलपटू राहिला जिवंत सीपीआर ही साधीसोपी आपत्कालीन उपचार प्रक्रिया आहे. मात्र, त्यासाठी बेसिक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्या व्यक्तीला सीपीआरची गरज आहे की नाही हे लक्षात येणं आवश्यक आहे.  कोणताही व्यक्ती बेशुद्ध पडला तर त्याला सीपीआर दिला जातो असे नाही. सीपीआर देण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक असते.  अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रशिक्षित असाल तरच त्याचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या