नवी दिल्ली, 29 एप्रिल: हिंदू धर्मामध्ये सर्व तिथींना महत्त्व दिलं जातं. त्यापैकी अमावास्येला विशेष महत्त्व आहे. महिन्यातून एकदा अमावास्या (New Moon) तिथी येते. अशा प्रकारे वर्षभरात 12 अमावास्या असतात. ज्या वर्षी अधिक मास असतो त्यावर्षी अमावास्यांची संख्या 13 होते. प्रत्येक अमावास्या काही खास कारणांसाठी महत्त्वाची मानली जाते. असं म्हणतात या दिवशी पितरांना नैवैद्य आणि दान (Donation) दिल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या अमावास्या तिथींमध्ये वैशाख महिन्यातील अमावास्येचाही (Vaisakha New Moon) समावेश होतो. यंदा ही अमावास्या शनिवारी (30 एप्रिल 22) असल्यानं ती शनी अमावास्या आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे याचदिवशी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Solar Eclipse) असणार आहे. त्यामुळे या दिवसाला ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शनी अमावास्येच्या रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी सुरू होणारं हे सूर्यग्रहण 1 मे रोजी पहाटे 4 वाजून 7 मिनिटांनी संपणार आहे. भारतातून हे ग्रहण आंशिक स्वरुपात दिसणार आहे. मात्र, या ग्रहणाचे मानवी जीवनावर सकारात्मक (Positive Effects) आणि नकारात्मक परिणाम (Negative Effects) जाणवतील. 2022 मधील या पहिल्या सूर्यग्रहणाचा तीन राशीच्या लोकांवर सर्वांत जास्त परिणाम होणार आहे. हर जिंदगी डॉट कॉमनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ज्योतिषाचार्य पंडित रमेश भोजराज द्विवेदी यांनी वैशाख महिन्यातील अमावास्येचं महत्त्व आणि सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे, याबाबत माहिती दिली आहे. प्रत्येक अमावास्येला स्वतःचं महत्त्व असलं तरी वैशाख महिन्यातील अमावास्या पुण्य देणारी (Virtuous) मानली जाते. असं मानलं जातं की, या दिवशी नदीमध्ये स्नान (River Bath) करून दान करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जर तुम्ही नदीत स्नान करू शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार अमावास्या तिथीला पितरांची पूजा (Ancestor Pooja) करण्याला विशेष महत्त्व आहे. असं केल्यासं पितृदोषापासून मुक्ती मिळते. हिंदू पंचांगानुसार, या वर्षी वैशाख महिन्यातील अमावास्या 30 एप्रिल (शनिवार) रोजी आहे. 29 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी अमावास्येला सुरुवात होणार आहे तर 30 एप्रिल रोजी रात्री 1 वाजून 57 मिनिटांनी संपणार आहे. या वर्षी वैशाख महिन्यातील अमावास्येला प्रीती योग (Priti Yoga) आणि आयुष्मान योग (Ayushman Yoga) जुळून येत आहेत. या दिवशी, 30 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांपर्यंत प्रीती योग राहील आणि त्यानंतर आयुष्मान योग सुरू होईल. पुराणांमध्ये, हे दोन्ही योग स्नान आणि ध्यानासाठी विशेष फलदायी मानले गेले आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार, 2022मधील पहिलं सूर्यग्रहण वृषभ राशीमध्ये 30 एप्रिल रोजी होणार आहे. भारतात हे ग्रहण आंशिक असेल, परंतु, त्याच्या प्रभावामुळे खालील तीन राशीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. 1) वृश्चिक रास: वृश्चिक (Scorpio) राशीच्या लोकांना मिळणाऱ्या आदर आणि प्रतिष्ठेत कमतरता जाणवू शकते. म्हणूनच या राशीच्या लोकांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे. वादविवाद न टाळल्यास या राशींच्या लोकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. या काळात शत्रूंपासून सावध राहा आणि कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवू नका. 2) कर्क रास: कर्क (Cancer) राशीचा स्वामी चंद्र असल्याने ग्रहणावेळी चंद्र आणि राहू हे मेष राशीतसोबत असतील. ही स्थिती कर्क राशीच्या लोकांसाठी तणाव निर्माण करणारी ठरू शकते. या राशीच्या लोकांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यांनी आरोग्याबाबतही जागरूक राहणं आवश्यक आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे या लोकांना अचानक काही आजार होण्याचे संकेत मिळू शकतात. खर्चामध्ये वाढ होऊन उत्पन्नही कमी होईल. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना या काळात संयम ठेवावा लागेल. 3) मेष रास: 2022 मधील पहिल्या सूर्यग्रहणाचा मेष (Aries) राशीवर सर्वांत जास्त परिणाम होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी जास्त सावध राहण्याची गरज आहे. सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. शिवाय त्यांचे विरोधकही अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोणतीही समस्या टाळण्यासाठी शहाणपणानं निर्णय घेणं आवश्यक ठरेल. मेष राशीच्या लोकांनी कोणत्याही कामात घाई टाळली पाहिजे. विशेषत: ग्रहण काळात या लोकांनी प्रवास आणि शुभ कार्य हाती घेऊ नये. अशाप्रकारे, वरील तीन राशींवर शनी अमावास्या आणि सूर्यग्रहणाचे विशेष परिणाम जाणवतील.