JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रॉस्टेट कॅन्सरपासून वाचवतो सेक्स; वीर्यस्खलनामुळे कमी होतो आजाराचा धोका

प्रॉस्टेट कॅन्सरपासून वाचवतो सेक्स; वीर्यस्खलनामुळे कमी होतो आजाराचा धोका

प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी योग्य अशी पद्धत ठरू शकते, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 सप्टेंबर : सेक्स (Sex) म्हणजे फक्त लैंगिक आनंद नाही. तर त्याचा आपल्या संपूर्ण आरोग्यावरही परिणाम होत असतो. अनेक अभ्यासानुसार सेक्समुळे प्रॉस्टेट कॅन्सरचाही (Prostate cancer) धोका कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. सेक्स असो किंवा हस्तमैथुन त्यामुळे होणाऱ्या वीर्यस्खलनामुळे (ejaculating) पुरुषांना प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो, असं काही अभ्यासात सिद्ध झालं आहे. कॅन्सर कोणताही असो कधी, कुणाला होईल सांगू शकत नाही. यामागे बरीच कारणे आहेत. तो आपल्याला होऊच नये यासाठी ठोस असे प्रतिबंधात्मक उपाय नाहीत. पण काही उपायांनी तो नक्कीच टाळता येतो किंवा त्याचा धोका कमी करता येतो. अशाच उपायांपैकी एक म्हणजे सेक्स. प्रॉस्टेट कॅन्सर जो पुरुषांना होणार कॅन्सर. सेक्समार्फत या कॅन्सरचा धोका कमी करता येऊ शकतो, असं संशोधनात दिसून आलं आहे. हे वाचा -  ‘पुरुषांपेक्षा महिला जास्त करतात धूम्रपान’, सिगारेटची सवय सुटणे होते कठीण! 2016 मध्ये झालेल्या एका अभ्यासात प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी किती वेळा वीर्यस्खलन होणं योग्य आहे, याची नेमकी माहिती मिळवण्यात आली. 1992 ते 2010 दरम्यान 32,000  पुरुषांचं सर्वेक्षण करून हा अभ्यास करण्यात आला आहे. वयाच्या विशीत ज्या पुरुषांचं महिन्याला कमीत कमी 21 वेळा वीर्यस्खलन झालं आहे, त्यांना महिन्यातून 7 किंवा त्यापेक्षा कमी वेळा वीर्यस्खलन झालेल्यांच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका 19 टक्के कमी असतो. तर वयाच्या ताळीत वारंवार वीर्यस्खलनामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका 22 टक्क्यांनी कमी होतो, असं या अभ्यासात दिसून आलं. हे वाचा -  OMG! जन्मतःच गोंडस बाळ झालं म्हातारं; चिमुकल्या लेकीचं रूप पाहून आईसुद्धा शॉक रॉयटर्स च्या रिपोर्टनुसार अभ्यासाचे संशोधक जेनिफर रायडर यांनी सांगितलं, प्रौढ वयात वीर्यस्खलन आणि सुरक्षित लैंगिक कार्य प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी योग्य अशी पद्धत ठरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या