नवी दिल्ली, 20 मार्च : अनेकजण विकेंडला बाहेर जेवणाचा, डिनरचा प्लॅन करतात. अशात नेमकं कोणत्या ठिकाणी जायचं, कोणत्या प्रकारचा अँम्बियन्स हवा, कसं जेवण हवं अशा विविध गोष्टींनुसार जेवणासाठी, डिनरसाठी रेस्टॉरंट निवडलं जातं. तुम्ही विकेंडला डिनरचा प्लॅन करत असाल, तर मुंबईत सी-फेस हॉटेल किंवा रेस्टॉरंटचा पर्याय (Sea View Restaurant In Mumbai Near Me) निवडू शकता. या काही सुंदर ठिकाणी तुम्ही तुमची डिनर डेट खास करू शकता, तुमचा विकेंड चांगला घालवू शकता. Hotel Sea Princess - फ्री Wi-Fi, फ्री पार्किंगसह हे रेस्टॉरंट छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एयरपोर्टपासून 5 किलोमीटरवर आहे. तर सिद्धीविनायक मंदिरापासून 10 किलोमीटरवर आहे. पत्ता - जुहू तारा रोड, जुहू बीचजवळ, एयरपोर्ट एरिया, जुहू मुंबई - 400049 फोन - 022 6906 1111 Sea Side Patio - या रेस्टॉरंटमध्ये चांगल्या स्वादिष्ट जेवणासह तुम्ही समुद्राचाही आनंद घेऊ शकता. या रेस्टॉरंटची Takeaway सर्विसही घेता येईल. Takeaway सर्विस 10.30 वाजता बंद होते. तर रेस्टॉरंट रात्री 12 वाजता बंद होतं. पत्ता - सिटीजन हॉटेल, 960, जुहू तारा रोड, एयरपोर्ट एरिया, जुहू, मुंबई - 400049 फोन - 022 6693 2525
Gadda Da Vida - आकर्षक, शांत आणि सी-फेस असलेलं हे कॉकटेल बार हॉटेल डिनरसाठी खास ठरेल. रात्री 1.30 पर्यंत हे रेस्टॉरंट सुरू असतं. या हॉटेलमध्ये Takeaway सर्विसही उपलब्ध आहे. पत्ता - लॉबी लेवल, बलराज सहानी मार्ग, जुहू बीच, मुंबई - 400049 ESTELLA - निसर्गरम्य बीचफ्रंट लोकेशनसह असणारं हे रेस्टॉरंट तुमची डिनर डेट खास करेल. ऑस्ट्रेलियन फूडसाठी हे प्रसिद्ध आहे. संध्याकाळी 6 वाजता हे रेस्टॉरंट सुरू होतं ते रात्री 1 पर्यंत सुरू असतं. तसंच हॉटेलची फ्री होम डिलीव्हरीही उपलब्ध आहे. पत्ता - Nichani Kuttir बिल्डिंग, जुहू तारा रोड, चंद्राबाई नगर, जुहू, मुंबई - 400049
The Bay View - Sea Face View असलेलं हे रेस्टॉरंट दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत सुरू असतं. या रेस्टॉरंटचा व्ह्यू जबरदस्त असून इथे परफेक्ट विकेंड-डिनर डेट करू शकता. पत्ता - हॉटेल मरिन प्लाझा, 29 मरिन ड्राईव्ह, 2nd Cross रोड, मुंबई - 400020 फोन - 022 2285 1212 Cafe Marina - हे रुफटॉप रेस्टॉरंट आहे. कबाब, कॉकटेलसाठी पॉप्युलर असून इथे समुद्रकिनाऱ्याजवळ बसून जेवणाचा आनंद घेता येईल. संध्याकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत सर्विस सुरू असते. पत्ता - Sea Palace हॉटेल, 26, PJ रामचंदानी मार्ग, अपोलो बाजार, कुलाबा, मुंबई - 400001 फोन - 022 6112 8000