JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुमच्या चेहऱ्याच्या आकारावरून कळतो स्वभाव आणि भविष्य, जाणून घ्या काय सांगतं सामुद्रिक शास्त्र

तुमच्या चेहऱ्याच्या आकारावरून कळतो स्वभाव आणि भविष्य, जाणून घ्या काय सांगतं सामुद्रिक शास्त्र

माणसाशी बोलल्यावर त्याच्याशी संवाद साधल्यावर तो माणूस कसा आहे हे आपल्यालाला कळतं मात्र तुम्हाला माहिती आहे का तुमच्या चेहऱ्याच्या आकारावरूनही तुमचा स्वभाव आणि भविष्य कळतं. कसं जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जुलै:  प्रत्येक व्यक्तीचा चेहरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. चेहऱ्याची ठेवण खूप गोष्टी सांगून जात असते. सामुद्रिक शास्त्रामध्ये (Samudrik Shastra) व्यक्तीच्या अंगलक्षणांवरून म्हणजेच शरीराची ठेवण, चेहऱ्याच्या आकारावरून तसंच, त्याच्या हातावरच्या रेषा, डोळे, शरीरावरील तीळ या गोष्टींवरून त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, वर्तवणूक, गुणवैशिष्ट्यं आणि भविष्य (Furute) सांगितलं जातं. आज आपण चेहऱ्याच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यं जाणून घेणार आहोत. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. गोल आणि जाड हनुवटी चेहऱ्यावरील गोल आणि जाड हनुवटी म्हणजेच ती व्यक्ती भाग्यवान आणि श्रीमंत असल्याचं दर्शवते. जाड हनुवटी असलेले लोक पैसे जमा करण्यात पटाईत असतात. हे लोक आरामदायी जीवन जगतात आणि म्हातारे होईपर्यंत त्यांचे गुडलक त्यांच्यासोबत असते. मोठं गोल कपाळ सामुद्रिक शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कपाळावरून (Forehead) त्याची आर्थिक स्थिती कळते. ज्यांचं कपाळ मोठं आणि गोल असतं, ते खूप श्रीमंत असतात, असं म्हटलं जातं. कारण त्यांच्या कपाळाचा असा आकार हे त्यांच्या श्रीमंत असण्याचे संकेत देत असतं. हेही वाचा - Heart attack Symptoms : हार्ट अटॅक आलाय हे कसं ओळखावं; काय आहेत याची लक्षणं? मोठ्ठं नाक चेहऱ्यातील इतर अवयवांप्रमाणेच तुमचं नाक तुमच्याबद्दल बरंच काही सांगतं. नाक नशीब, संपत्ती आणि करिअरबद्दल अनेक गोष्टी सांगतं. चांगल्या आकाराचं म्हणजे सरळ नाक संपत्ती आणि समृद्ध जीवनाचे संकेत देतं. तसंच एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही नाकपुड्यांचा आकार सारखा नसेल तर त्यांच्या नशिबात पैसा नसतो, असं म्हणतात. तसंच मोठ्ठं नाक असलेली एखादी व्यक्ती भविष्यात श्रीमंत होणार असल्याचं दर्शवते. जाड आणि मोठे कान आपले कान धन आणि सौभाग्याचं प्रतीक आहेत, असं सामुद्रिक शास्त्रात मानलं गेलं आहे. एखाद्या व्यक्तीचे जाड कान तिच्या उत्साहाचं प्रतिनिधित्व करतात. हा उत्साह करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि यशासाठी खूप महत्वाचा आहे. जर तुमचे कान जाड आणि चेहऱ्याला चिकटलेले असतील किंवा कान जाड आणि लांब असतील तर तुम्ही भविष्यात श्रीमंत व्हाल, याची ती लक्षणं आहेत. हेही वाचा - वार्षिक सुट्टी आरोग्यासाठी का आहे फायदेशीर? पाहून तुम्हीही बॉसकडे मागाल मोठी लिव्ह फुगलेले गाल ज्या व्यक्तीचे गाल जाड किंवा फुगलेले असतात त्यांचा आत्मविश्वास खूप असतो. त्यामुळे त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. एखाद्या व्यक्तीचे गाल त्याचा संकल्प आणि इच्छा दर्शवतात, असं मानलं जातं फुगलेले गाल असणारी व्यक्ती आक्रमक, शूर आणि हुशार आहे आणि खूप पैसे कमवू शकते, असं दर्शवतात. खोल डोळे डोळे हा भविष्य दर्शवणारा महत्वाचा अवयव आहे. साधारणपणे श्रीमंत लोकांचे डोळे मोठे आणि खोल असतात. त्यांच्या डोळ्यांतही पांढरा आणि काळा असा फरक स्पष्ट दिसतो. असे लोक व्यवसायात खूप चांगली कामगिरी करतात. चौकोनी चेहरा आणि लाल ओठ ज्या लोकांचा चेहरा चौकोनी असतो आणि ओठ लाल असतात, त्यांना आयुष्यात खूप पैसा मिळतो. जगात चेहऱ्याच्या अशा आकाराचे अनेक श्रीमंत लोक आहेत. बारीक शरीरयष्टी आणि मोठा चेहरा काही जण सडसडीत असतात; पण त्यांचा चेहरा मोठा असतो. असे लोक जीवनात खूप यश मिळवतात. त्यांच्याकडे अमाप संपत्ती असते आणि ते कोणतीही संधी हातातून जाऊ देत नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या