JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Samsung Technology : कामाची वेळ संपली की कॉम्प्युटर माऊसच तुम्हाला जागेवर बसू देणार नाही; जाणून घ्या काय आहे प्रकार

Samsung Technology : कामाची वेळ संपली की कॉम्प्युटर माऊसच तुम्हाला जागेवर बसू देणार नाही; जाणून घ्या काय आहे प्रकार

तंत्रज्ञानात (Technology) दररोज नवनवीन बदल होत आहेत. एखादा कर्मचारी कसा काम करत आहे, याची माहिती ठेवण्यासाठी कंपनीकडून तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 सप्टेंबर : तंत्रज्ञानात (Technology) दररोज नवनवीन बदल होत आहेत. एखादा कर्मचारी कसा काम करत आहे, याची माहिती ठेवण्यासाठी कंपनीकडून तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. परंतु, कर्मचाऱ्याने त्याच्या कार्यालयीन वेळेपेक्षा (Office Time) अधिक काम म्हणजेच ओव्हरटाइम (Overtime) करू नये म्हणून एक विशिष्ट कॉम्प्युटर माऊस (Computer Mouse) आणलाय. एखादा कर्मचारी ऑफिसमध्ये ओव्हरटाइम करत असेल तर त्याचा हातातून हा माऊस पळायला लागतो. ‘झी न्यूज हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलंय.

सॅमसंग या कंपनीच्या बॅलन्स माऊसच्या रूपात हे उत्पादन (Product) दिसतं. जेव्हा तुम्ही अधिक काम करू लागता तेव्हा माऊस हातून निसटून डेस्कवर पळू लागतो. हे उत्पादन साधारण दिसणाऱ्या माऊसप्रमाणं आहे.

हे ही वाचा :  Life@25: सोशल मीडियावर भावनेच्या आहारी जाणं पडेल महागात, तरुणांनी घ्यायला हवी ‘ही’ काळजी

विशेष म्हणजे अद्याप ते अस्तित्वात आलं नसून, ही संकल्पना एका जाहिरात एजन्सीच्या सहाय्याने तयार केली गेलीय. सॅमसंग बॅलन्स माऊसचा व्हिडिओ सॅमसंगच्या कोरियन युट्यूब चॅनलवर (Korean YouTube Channel) पोस्ट केला गेलाय. कोरियातील काम करण्याच्या जीवनशैलीतील पद्धतीत बदल करण्याच्या उद्देशाने बॅलन्स माऊसची संकल्पना समोर आणली गेली.

सॅमसंगने त्यांच्या व्हिडिओत म्हटलं आहे की, ऑफिसमध्ये बहुतांश कर्मचारी काम पूर्ण झाल्यानंतरही लवकर ऑफिस सोडत नाहीत. उर्वरित कामं करण्याचा व अतिरिक्त कामाचा त्यांच्यावर ताण असतो. जास्तीचं काम करताना आरोग्य, खासगी जीवनासह इतर गोष्टी विसरणाऱ्यांसाठी हे उपकरण (Device) महत्त्वाचं असल्याचं सॅमसंगने व्हिडिओत म्हटलंय. कंपनीच्या मते, हा सर्वसाधारण माऊस नाही, पण गरजेपेक्षा अधिक काम करणाऱ्यांना रोखण्याची क्षमता यात आहे.

असा काम करतो हा माऊस

कार्यालयीन कामाचा अधिक ताण असल्यास ते उरकण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. त्यासाठी ऑफिसमध्ये अधिक वेळ दिला जातो. पण कामाची वेळ संपल्यानंतर तुम्ही ओव्हरटाइम करत असाल तर माऊस हातून निसटून जाईल. माऊसच्या खालील आवरणातून चाकं निघतील आणि माऊस पळायला लागेल. त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यास गती जास्त असल्याने तो हाती लागणार नाही. माऊस हाती लागला तरी त्याच्यावर असलेला भाग निघून जाईल व माऊस पूर्णपणे उघडा पडेल. बॅलन्स माऊसचा वापर करून कामाच्या वेळेनंतर लोकांनी खासगी जीवनाचा आनंद घ्यावा, हा मूळ उद्देश या माऊसचा आहे.

हे ही वाचाबाप्पाच्या देखाव्यासाठी गाठले राजस्थान, अकोलकरांना घडवले नव्या संस्कृतीचे दर्शन VIDEO

दरम्यान, सध्या कामाचा अतिरिक्त बोजा वाढल्याने कंपनीनं ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा कर्मचाऱ्यांना अधिक काम करावं लागत आहे. परिणामी, आरोग्याच्या समस्यांसह इतर कौटुंबिक समस्याही उदभवत असल्याचं पाहायला मिळतं. आपल्या कामासह खासगी आयुष्यालाही तितकंच महत्त्व देणं आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन ओव्हरटाइम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातून निसटणारा हा माऊस एक चांगला पर्याय म्हणावा लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या