मॉस्को, 02 सप्टेंबर : आपले ढोले-शोले (Biceps) असावेत असं प्रत्येक तरुणाला वाटतं. त्यासाठी बहुतेक तरुण जीममध्ये (Gym) जातात. पण किती तरी जणांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त बॉडी (Artificial Body) बनवायची असते. मग एक्सरसाइझशिवाय इतर मार्गांनी ते मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. पण हाच शॉर्टकट किती भयंकर ठरू शकतो, याची कल्पना तुम्हाला या बॉडीबिल्डरचा (Bodybuilder) भयंकर व्हिडीओ पाहून लक्षात येईल (Shocking video). रशियातील (Russia) 25 वर्षांचा बॉडीबिल्डर किरिल टेरेशिन (Kirill Tereshin) यानेसुद्धा आपली बॉडी बनवण्यासाठी शॉर्टकट निवडला (Oil injecting in body) आणि त्याला भयंकर परिणामांना सामोरं जावं लागलं. इंजेक्शन घेऊन घेऊन त्याने आपले बायसेप्स बनवले (Oil injected biceps) पण फायटिंग (Bodybuilder fighting) करताना त्याचे हे मोठे बायसेप्स फुटले (Biceps explode). किरिलने आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो पाहून तुम्ही अक्षरशः हादराल.
व्हिडीओत पाहू शकता किरिल आपल्या प्रतिस्पर्ध्यासोबत फायटिंग करतो आहे. त्यानंतर अचानक त्याच्या एका हाताचं बायसेप्स फुटतं. तो या व्हिडीओत आपला फुटलेलं बायसेप्स दाखवतानाही दिसतो आहे. ज्याला छिद्र पडलं आहे आणि त्यातून काहीतरी द्रव वाहताना दिसतं आहे. हे द्रव म्हणजे तेल आहे. हे वाचा - बापरे! बॉडी बिल्डर बनण्याच्या नादात भयंकर अवस्था; तरुणाचा Shocking video viral किरिलीने आपले बायसेप्स बनवण्यासाठी ऑईल इंजेक्शन घेतलं होतं. वयाच्या विशीपासूनच त्याने हे इंजेक्शन घ्यायला सुरुवात केली होती. 2020 साली त्याने हे सिंथोल तेल इंजेक्शन घेतलं होतं, ज्यामुळे त्याचे दोन्ही दंड मोठे झाले. हे तेल बायसेप्समध्ये जमा होतं आणि बायसेप्स एकदम भारी दिसतात. पण हे बायसेप्स तितके मजबूत नसतात. किरील आपले बायसेप्स घेऊन लढाईसाठी उतरला आणि मग काय फक्त दिसायला भारी असलेले हे बायसेप्स फुटले. किरिलला तात्काळ रुग्णालायात दाखल करण्यात आलं. आतापर्यंत त्याच्या दोन सर्जरी झाल्या आहेत. त्याच्या शरीरातील डेड मसल्स काढून टाकण्यात आले आहेत. कदाचित त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचा हातही कापावा लागू शकतो, असं डॉक्चरांनी सांगितलं आहे. हे वाचा - हसता-बोलता हार्ट अटॅकने घेतला जीव; सिद्धार्थच्या मृत्यूनंतर हादरवणारा VIDEO किरिललाही आता बॉडी बनवण्यासाठी आजमावलेल्या शॉर्टकटचा पश्चाताप होतो आहे. आपली अवस्था झाली तशी इतरांची होऊ नये म्हणून त्याने आपला हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तसंच इसराना बॉ़डी बनवण्यासाठी असा शॉर्टकटचा वापर करू नका, असं आवाहनही केलं आहे.